Friday, June 14, 2024

सेफ हाऊस

Safe House
सेफ हाऊस
केप टाऊन येथे सीआयएचे एक सेफ हाऊस आहे.अर्थात ती माहिती गुप्त आहे. सीआयए एजंट मॅट वॉटसन तिकडे केयर टेकरचे काम करतो.तो सीआयए मध्ये काम करतो हे त्याच्या मैत्रिणीलाही माहीत नसते.खरे तर तो त्या गुप्त जागी काम करून कंटाळला आहे .कारण तिथे अनेक वर्षे कोणीही आलेले नाही.
टोबिन फ्रॉस्ट माजी सीआयए एजंट .नऊ वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला आणि तो अनेक देशांची गुपिते त्यांच्या शत्रू देशाला विकून अमाप पैसे कमावतो असा आरोप त्याच्यावर आहे.आताही तो केप टाऊनमध्ये एमआय 6 कडून काही गुपिते घेण्यासाठी आलाय.पण इथे येताच शत्रूची आपल्यावर नजर आहे याची जाणीव होते.पुढे ती गुपिते घेताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो .या हल्ल्यातून आपण वाचू शकत नाही हे लक्षात येताच तो सरळ अमेरिकन वकीलातीत आत्मसमर्पण करतो.
सीआयए त्याला ताबडतोब मॅट वॉटसनच्या सेफ हाऊसमध्ये हलविते. काहीतरी काम मिळाल्यामुळे मॅट खुश होतो .अमेरिकन अधिकारी फ्रॉस्टची चौकशी करत असताना पुन्हा फ्रॉस्टच्या शत्रूंचा हल्ला त्या सेफ हाऊसवर होतो आणि सर्व अधिकारी मारले जातात.मॅट फ्रॉस्टला घेऊन तिथून निसटतो.
मॅटने फ्रॉस्टला पळून जाण्यात मदत केलीय असा सीआयएला संशय आहे. त्यामुळे सीआयए आणि केप टाऊन पोलीस दोघांच्याही मागे लागलीय.
अशी कोणती गुपिते फ्रॉस्टकडे आहेत जी बाहेर येऊ नये म्हणून सीआयए अनेकांचे बळी घेत त्या दोघांच्या मागे आहे.मॅट फ्रॉस्टला सुखरूपणे अमेरिकेत पाठवेल का ?
डेंझल वॉशिंग्टनने टोबिन फ्रॉस्ट आत्मविश्वासाने रंगविला आहे. तर रायन रेनॉल्डने मॅटच्या भूमिकेत त्याला योग्य साथ दिलीय.वेगवान आणि थरारक असा हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

No comments:

Post a Comment