Saturday, June 22, 2024

गांठ

Gaanth
गांठ
दिल्लीतील जमुना नदीजवळ एका वस्तीत चंदेल फॅमिली  सामुदायिक गळफास लावून घेते.घरात त्यावेळी होमहवन चालू असतो . निलंबित पोलीस ऑफिसर गदरसिंहला या केससाठी नियुक्त केले जाते.गदारसिंह तापट आहे . तो सतत दारूच्या नशेत असतो .त्याच्या घरीही प्रॉब्लेम चालू आहेत. पण तो प्रामाणिक अधिकारी आहे.ज्यावेळी त्याच्या हाती ही केस सोपवली जाते तेव्हाही तो नशेत असतो .
तो घटनास्थळी जातो तेव्हा शोध घेताना चंदेल फॅमिलीतील एक कुत्राही विचित्रपणे मेलेला आढळतो .ह्या आत्महत्या नाहीत तर खून आहे असा निष्कर्ष गदारसिंह काढतो . अचानक चंदेल फॅमिलीतील एक लहान मुलगा फास लावलेल्या अवस्थेतही जिवंत असलेला आढळतो .कुश हा दहा वर्षाचा मुलगा अबोल आहे .डॉ. साक्षी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे .तीही ह्या केसकडे वेगळ्या नजरेतून पाहते आणि तिलाही काही धागेदोरे मिळू लागतात.ती गदरसिंहला मदत करू पाहते.
अचानक कुश हॉस्पिटलमध्ये मरण पावतो.पण तो ही खून आहे असे डॉ.साक्षी सर्वाना पटवून देण्याचा प्रयत्न करते.
वरिष्ठांकडून येणाऱ्या प्रेशरमुळे गदरसिंह  चंदेल परिवारातील दोन नोकरांनी पैश्यासाठी हे खून झाल्याचे जाहीर करतो.
सनी हा खाजगी पत्रकार या प्रकरणात पहिल्यापासून लक्ष ठेवून आहे .तो गदरसिंहला खोटे ठरवितो .पण त्याचाही खून होतो .
चेंडेल परिवार थोडे रहस्यमय आहे .घरात सर्वांचे मिळून एकच बँक अकाउंट आहे .ते कोणाच्या घरी जात नाहीत कोणाशी बोलत नाही .कोणाला घरी यायची परवानगी नाही .चंदेल परिवारातील एका मुलीचे लग्न ठरले होते .तिचा साखरपुडा ही झाला होता .पण त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही दाखवत नाही .
काय आहे यामागे रहस्य ?? या घटनेपूर्वी एक व्यक्ती चंदेलच्या घरी आली होती आणि त्यानंतर सर्व काही बदलले .कोण होती ती व्यक्ती ?? गदरसिंह पुन्हा निलंबित झालाय .पण तरीही डॉ. साक्षीच्या मदतीने तो या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतोय.
एक थरारक ,उत्कंठा ताणून धरणारी .आपल्याला दुसऱ्या सिजनची प्रतीक्षा करायला लावणारी ही सिरीज जिओ सिनेमावर हिंदी भाषेत आहे .

No comments:

Post a Comment