Saturday, June 15, 2024

टूथ परी

Tooth Pari : When Love Bites
 टूथ परी 
कोलकत्यातील एका मेट्रो स्टेशनच्याखालील अंधाऱ्या भुयारात त्यांची वस्ती होती.त्याना जमिनीवर यायला परवानगी नव्हती. 
पण रात्र झाली की रुमी आणि श्रीला वर यायच्या आणि लोकांच्यात मिसळायच्या .कधी कधी योग्य व्यक्ती गाठून त्याच्या गळ्याला चावून रक्तही प्यायच्या.
खरे आहे....! ते सर्व ड्रॅक्युला होते.रक्तपिपासू राक्षस .पण त्यांचे काही नियम होते.माणसाच्या शरीरातून रक्त काढून प्यायचे नाही हा मुख्य नियम.
पण रुमी नियम पाळत नव्हती.परिणाम  एका माणसाचे रक्त पिताना तिचा एक सूळा तुटला. सुळ्याशिवाय रक्त पिता येणार नाही म्हणून ती एका तरुण डेंस्टीस डॉ. बिक्रम रॉयकडे गेली.पण डॉ.बिक्रम तिचे रक्त पाहूनच घाबरला आणि चुकून त्याच्या रक्ताचे दोन थेंब तिच्या तोंडात पडले .एका व्हर्जिन तरुणाच्या रक्ताची चव पाहून ती खुश झाली आणि तिने ती गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली .
कोलकात्यात काटमांडूस नावाचा एक ग्रुप आहे.त्यात सर्व वृद्ध व्यक्ती आहेत.लुका लुना नावाची स्त्री या ग्रुपचे नेतृत्व करतेय.तिला या ड्रॅक्यूला समूहाची कल्पना आहे .1960 च्या दशकात तिने या ग्रुपचे काही सदस्य मारले होते.तिच्यातही काही अदभुत शक्ती आहेत.
डॉ. बिक्रम रॉयकडे श्रीला रक्त पिण्यासाठी जाते पण तिथे लुका लुना येते आणि श्रीलाला ठार करते. रुमी आता डॉ बिक्रम रॉयच्या प्रेमात पडली आहे . इन्स्पेक्टर कार्तिक पाल या सर्वांच्या मागावर आहे .त्याचे वडील ही या काठमांडूस ग्रुपचे महत्वाचे सभासद होते. कार्तिकचा आपल्या वडिलांवर विश्वास नाही पण हळूहळू त्याला सत्य समजते.
पण पुढे काय होईल ?? लुका लुना रुमी आणि इतरांना संपवून टाकेल की स्वतः यात भस्म होईल ?? रुमी डॉ .बिक्रम रॉयला स्वतः ची खरी ओळख देईल का ? आणि बिक्रम रॉय तिचा ड्रॅक्युला म्हणून स्वीकार करेल ?? काठमांडूस ग्रुप जनतेसमोर ड्रॅक्युलाचे सत्य सिद्ध करू शकेल ??
दुसऱ्या सिझन ची झलक आपल्याला शेवटच्या भागात दिसते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेतील मजेशीर सिरीज. 

No comments:

Post a Comment