Wednesday, March 15, 2017

मन वढाय वढाय .......सौ. नेहा दाबक

मन वढाय वढाय .......सौ. नेहा दाबके
कविता म्हटल्या कि आपल्या डोळ्यासमोर पाडगावकर ,करंदीकर ,कुसुमाग्रज ,हे जुने आणि सौमित्र ,चंद्रशेखर गोखले हेच आठवतात . पण त्याही पलीकडे असे काही आहेत जे सहज सोप्या भाषेत उत्तम कविता करू शकतात . सौ. नेहा दाबके या त्यातीलच एक . स्वप्नातील राजकुमार ते वास्तवातील चटके यातील प्रवास उत्तम आणि साध्या सरळ रचनेत त्यांनी मांडला आहे . मुक्तछंद प्रकारातील या कविता वाचताना खूप आनंद देतात . एका सध्या गृहिणीची रोजची धावपळ आणि त्यातून सुचलेल्या कविता या आपल्यातल्याच वाटतात . मुलीची लोकल चुकू नये म्हणून तिला गाडीवरून सोडताना होणारी मनाची घालमेल आपल्याला चटका लावते .तर रोजच्या जेवणातील वस्तू महाग झाल्या कि त्यांची चव कशी बिघडते याची मिश्किल मांडणी आणि पाणीप्रश्नावर भांडणारे नवरा बायको आपल्याला हसवून जातात . स्वप्नातील राजकुमारकडे पाहून आपण हळवेही होतो . सर्व कविता वाचून असे वाटते कि अरे ह्या तर आपल्याच आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहे आणि किती समर्पकपणे त्या मांडल्या गेल्या आहेत . खरेच मन अस्वथ असेल तर हा कवितासंग्रह वाचून मूड रिफ्रेश करायला काहीच हरकत नाही . सध्यातरी हा खाजगी कविता संग्रह आहे  पण भविष्यात उत्तम कविता वाचायला मिळतील याची खात्री वाटते . सौ. नेहा दाबके याना खूप शुभेच्छा

No comments:

Post a Comment