Sunday, March 5, 2017

लाईम लाईट ....अच्युत गोडबोले

लाईम लाईट ....अच्युत गोडबोले - निलांबरी जोशी हॉलिवूड आणि विदेशी चित्रपटांचे आकर्षण सगळ्यांना असते .आपण  अनेक प्रसिद्ध अजरामर चित्रपट पाहतो अनेक विदेशी कलाकार ,दिग्दर्शक , आपल्याला माहित आहेत आपण त्यांचे चाहते हि आहोत  . पण हि माणसे कशी घडली ,त्यांच्याकडून हे चित्रपट कसे घडले त्यांची मेहनत ,त्यांचे खासगी  आयुष्य कसे होते याबद्दल आपल्याला फार काही माहित नसते .पण हे सर्व आपल्याला एकाच पुस्तकात मिळाले तर ??
. लाईमलाईट मध्ये हेच आहे . विदेशी चित्रपट सुष्टीतले दिग्गज दिग्दर्शक आणि त्यांच्या हातून घडलेल्या उत्कृष्ट कलाकृती यांची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे .
स्वतःचे दुःख लपवत  आणि त्या दुःखाला कारुण्याची झालर लावून जगाला खो खो हसवणारा चार्ली चॅप्लिन  .तर जगातील तीन महान दिग्दर्शकाच्या पंक्तीत बसलेला पण एकही ऑस्कर न मिळविणारा थरारक ,रहस्यमय चित्रपटांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक आणि त्याचे प्रसिद्ध चित्रपट सायको. डायल एम फॉर मर्डर . मिकी माऊसला डोनाल्ड डक सारखे कार्टून  अजरामर करणारा कार्टूनचा बादशहा वॉल्ट डिस्ने . जपानी चित्रपटाला जागतिक पातळीवर नेणारा अकिरा कुरोसावा यांची सुरेख माहिती यात आहे . राशोमन सारखा महान चित्रपट आणि शोले चित्रपट ज्या चित्रपटावरून घेतला आहे तो सेव्हन सामुराई हे चित्रपट कुरोसवाच्या करकीर्दीत मनाचा तुरा रोवून उभे आहेत . त्याच प्रमाणे इंगमार बर्गमन ,सौंदर्याची खाण मर्लिन मन्रो, गॉडफादर मार्लन ब्रॅडो ,नवीन नवीन प्रयोग करणारा स्टीव्हन स्पीलबर्ग यांची माहिती हि दिली आहे .
खरेतर विदेशी चित्रपटसुष्टीचा जवळजवळ संपूर्ण इतिहास यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे .कुरोसावा चा राशोमन  आपले महान दिग्दर्शक सत्यजित रे यांनी सलग तीन दिवस कोलकात्यात पहिला होता यावरूनच तो चित्रपट कसा असेल हे कळून येते .
खरेच अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांचे असे पुस्तक मराठी साहित्याला दिल्याबद्दल आभार.

No comments:

Post a Comment