Thursday, March 16, 2017

द गन्स ऑफ नॅव्हारन

द गन्स ऑफ नॅव्हारन ..अलिस्टर मॅकलिन ...अनुवाद अशोक पाध्ये 
1961 साली प्रदर्शित झालेला" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील  एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा  सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या पथकाची नियुक्ती होते .  खैसर बेटाजवळ  जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते .  अतिशय थरारक अशी कादंबरी आणि त्यावर बेतलेला चित्रपट .

No comments:

Post a Comment