Sunday, November 11, 2018

क्रायसिस ....रॉबिन कूक

क्रायसिस ....रॉबिन कूक
अनुवाद.... डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिकेशन
डॉ. क्रेग बोमन आपल्या मादक मैत्रिणीबरोबर एका कार्यक्रमाला जाण्याची तयारी करत होता इतक्यात त्याच्या एका स्त्री पेशंटची प्रकृती गंभीर असल्याचा फोन आला.तो ताबडतोब आपल्या मैत्रिणीला घेऊन त्या पेशंटच्या घरी गेला तिथून त्याने तिची तपासणी करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची सूचना केली .पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताच तिचा मृत्यू झाला .आठ महिन्यानंतर डॉ. क्रेग बोमनवर मृत स्त्रीच्या नवर्याने अयोग्य पद्धतीने उपचार केल्याबद्दल दावा ठोकला.त्याची केस कोर्टात सोमवारी उभी राहिली आणि शुक्रवारी संपणार आहे . क्रेगची बायको अलेक्सीने आपल्या भावाला मदतीला बोलावले . डॉ .जॅक स्टेपलटन न्यूयॉर्क शहरात वैद्यकीय तपासनीस आहे आणि  नेमके शुक्रवारी त्याचे  लग्न आहे .तरीही तो आपल्या बहिणीला मदत करण्यासाठी बोस्टनला पोचतो आणि आठ महिन्यांपूर्वी दफन केलेल्या त्या स्त्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचा निर्णय घेतो .  शवविच्छेदन करू नये यासाठी त्याला धमक्या येतात. त्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो. तरीही तो हे कार्य पार पाडतो आणि हाती आलेले रिपोर्टपाहून चक्रावून जातो. काय आहे त्या रिपोर्ट मध्ये...???? डॉ क्रेग खरोखरच निर्दोष आहे का ...?? यामागे कोणते षडयंत्र आहे ....?? सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ. जॅक स्वतः च्या लग्नाला वेळेवर उपस्थित राहू शकतील का ....?? अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा वाढविणारे पुस्तक .

No comments:

Post a Comment