Sunday, December 3, 2017

डायल डी फॉर डॉन ...... निराजकुमार

डायल डी फॉर डॉन ...... निराजकुमार
अनुवाद …..........भारती पांडे
मंजुल पब्लिशिंग हाउस
लेखक दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आहेत . पण त्यांनी दहा वर्षे सीबीआयमध्ये सेवा केली . या दहा वर्षात त्यांनी खूप कठीण केसेस सोडविल्या . त्यातील महत्वाच्या अश्या दहा केसेसचा  तपास यात मांडला आहे . लोकांना सीबीआय म्हणजे खूप भक्कम आणि सर्वश्रेष्ठ संस्था वाटते . पण सीबीआयला प्रत्येक ठिकाणी स्थानिक पोलीस आणि इतर सरकारी सेवेचा आधार घ्यावा लागतो .यातील काही कथा खूपच नवीन आहेत वाचकांसाठी . मुंबई बॉम्बस्फोट घटनेतील प्रमुख आरोपी याकूब मेमन याच्या कुटुंबियांना दुबईतून मुंबईत आणण्याची कथा रोमांचकारी आहे . तसेच भारतीय क्रिकेट आणि आयपीएल मधील मॅच फिक्सिंग खूपच आश्चर्यकारक आहे .पंजाबच्या मुख्यमंत्री यांच्या खुनाचे कारस्थान आणि तो बेत पूर्ण करणाऱ्या सुत्रधाराची अटक श्वास रोखून धरणारी आहे . यातील प्रत्येक कथा वाचण्यासारख्या आहेत . यातून सीबीआय अपुऱ्या मनुष्यबळावरही कसे काम करते हे लक्षात येते .

No comments:

Post a Comment