Tuesday, June 4, 2019

बैरागड..... डॉ. मनोहर नरांजे

बैरागड..... डॉ. मनोहर नरांजे
साकेत प्रकाशन
लग्न करण्यासाठी डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या चार अटी होत्या .
१) विवाहकार्य केवळ 5 रु पार पडले पाहिजे.
२) चाळीस किमी पायी चालायची तयारी असावी.
३)४०० रु.महिन्याचा खर्च भागवावा लागेल.
४) स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी भीक मागावी लागेल.
यामागे डॉक्टरांची काही  कारणे होती.अनावश्यक खर्च टाळावा.पाच रुपयात लग्न करू शकणारीच हे अपरीग्रह व्रत आचरु शकेल. मेळघाटात  पावसात येण्याजाण्याचे मार्ग खुंटतात अश्यावेळी पायी चालण्याशिवाय पर्याय नसतो .डॉक्टर प्रत्येक पेशंटकडून 1 रु फी आकारीत त्यामुळे त्यांची प्राप्ती 400 रु पुढे जाणे शक्य नव्हती.स्वतःविषयी मीपणा जात नाही तोपर्यंत सेवाकार्य घडत नाही असे त्यांना वाटत होते म्हणून स्वतःसाठी नाही तर दुसर्यांसाठी तरी प्रसंगी भीक मागायची तयारी ठेवली पाहिजे.
पण मेळघाटात आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉक्टरला मुलगी मिळेल का ..??  डॉ. स्मिता मांजरेने हे आव्हान स्वीकारले आणि ती सौ. डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे झाली.
अनेक अडचणींना सामोरे जात दोघांनी आदिवासींचा विश्वास संपादन केला.कुपोषण..बालमृत्यू... अश्या केवळ शारीरिक व्याधी नव्हत्या तर जबरदस्तीने होणारे धर्मांतर,आदिवासींचे होणारे शोषण,त्यांचा नैसर्गिक साधनसंपत्तीवर नाकारला जाणारा हक्क अशी बरीच इतरही कारणे होती ..आदिवासींचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न पाहून आपण हेलावून जातो . गांधीजी आणि विनोबाजीच्या विचारांचा लेखकावर असणारा पगडा आणि त्यानुसार त्याची वागणूक पाहून दोन्ही महात्म्यांची थोरवी पटते.
मेळघाटातील आदिवासींसाठी अविरत झटणाऱ्या डॉ. कोल्हे दांपत्याला मानाचा मुजरा .

No comments:

Post a Comment