Thursday, August 1, 2019

द ग्रेट डायरेक्टर...1

#cinemagully
द ग्रेट डायरेक्टर
चार्ली चॅप्लिन (१८८९- १९७७)
ऑल टाईम ग्रेट मध्ये मोडणारा हा पहिला डायरेक्टर. हा स्वतः अभिनेता.. निर्माता..संगीतकार... ही होता. याने निर्माण केलेला ट्रम्प समाजातील पीडित व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो .ज्याने नशिबाला कधीही दोष दिला नाही .डायरेक्टर म्हणून त्याचे दोन साधे नियम होते . विनोदी प्रसंगासाठी लॉंग शॉट्स तर हळव्या प्रसंगासाठी क्लोज शॉट . यंत्रयुगात सामान्य माणसाची होणारी फरफट त्याने मॉर्डन टाइम्स (१९३६) मध्ये दाखविली होती. तर आंधळ्या मुलीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी चोरी करणारा गरीब नायक  सिटीलाईट  (१९३१ ) मध्ये उभा केला होता . शेवटी डोळे आल्यावर ती मुलगी त्याला हाताच्या स्पर्शाने हाच आपला उपकारकर्ता म्हणून ओळखते तो सिन तर अप्रतिम होता. युद्धाने कोणाचेही भले होत नाही उलट सामान्य माणसाचे किती हाल होतात हे त्याने आपल्या पहिल्या आणि एकमेव बोलपटात द ग्रेट डिक्टेटर (१९४०) मध्ये दाखवून दिले . हिटलरच्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या ह्या भूमिकेने लोकप्रियतेचा कळस गाठला होता .

No comments:

Post a Comment