Thursday, August 8, 2019

महाभारताचे रहस्य.... ख्रिस्टोफर सी. डॉयल

महाभारताचे रहस्य.... ख्रिस्टोफर सी. डॉयल
अनुवाद...... मीना शेटे - संभू
मंजुल पब्लिकेशन हाऊस
इ. सन. पूर्व २४४ ...एका घनदाट जंगलातील  गुहेत सम्राट अशोक आपल्या सरदार सूरसेनसोबत उभे होते . त्या गुहेत होते एक भयानक रहस्य . ते रहस्य पाहून सम्राट अशोकाना भयानक धक्का बसला होता . आता त्या रहस्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती .  त्या रहस्याचा भेद झाला असता तर जगाचा विनाश नक्की होता . मग त्याने त्या रहस्याचे रक्षण करायची जबाबदारी काही मोजक्याच लोकांकडे सोपवली . ती माणसे आपल्या पुढच्या पिढीत त्या रहस्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवित होते . हे गेल्या दोन हजार वर्षांपासून चालू आहे . पण 2001 साली तालिबान्यांनी बामियानमधील प्राचीन बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या . व्हिडिओमध्ये बुद्धाच्या मागील बाजूस असलेली ती प्राचीन गुहा स्पष्ट दिसत होती .त्या गुहेत एका माणसाचा सांगाडा सापडलेला आहे आणि तो दीड हजार वर्षांपूर्वीचा आहे अशी माहिती आहे .
हल्लीच एका निवृत्त अणूशास्त्रज्ञाचा खून होतो . पण मृत्यूपूर्वी त्याने अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या पुतण्याला काही इमेल पाठविले होते. ते इमेल सांकेतिक शब्दात होते . आता त्यांच्या पुतण्यावर विजयवर खुनी आणि ते रहस्य शोधून काढून त्याचे रक्षण करायची जबाबदारी आहे .
काय आहे ते रहस्य ज्याचा संबंध महाभारताशी आहे .एक वेगवान थरारक प्राचीन गूढ इतिहासात घेऊन जाणारी रहस्यमय कादंबरी .

No comments:

Post a Comment