Sunday, August 18, 2019

अ प्रिझनर ऑफ बर्थ... ,जेफ्री आर्चर

अ प्रिझनर ऑफ बर्थ... ,जेफ्री आर्चर
अनुवाद .... लीना सोहनी
न केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून डॅनीला वीस वर्षाची जन्मठेप झालेली आहे. तो निरपराध आहे याची खात्री त्याची प्रेयसी बेथला आहे .कारण तिच्यासमोरच ती घटना घडली आहे आणि ज्याचा खून केल्याचा आरोप आहे तो डॅनीचा प्रिय मित्र बर्नि हा तिचा भाऊच आहे . ते तिघे साखरपुडा होताच एका हॉटेलात जेवायला जातात तेव्हा तिथे असलेल्या चारजणांशी त्यांची बाचाबाची होते आणि त्याचे पर्यवसान बर्निच्या खुनात होते . पण ते चारही जण नावाजलेले असतात . ते अक्कलहुषारीने डॅनीलाच अपराधी सिद्ध करतात . वरच्या कोर्टातही डॅनीचे अपील फेटाळले जाते . तुरुंगाच्या  कोठडीत निक आणि बिल हे कैदी त्याच्या सोबतीला असतात . आता केवळ तुरुंगातून पळून जाऊन स्वतःचे निर्दोषत्व शाबीत करणे हाच एकमेव पर्याय डॅनीसमोर आहे .
डॅनीची तुरुंगातून सुटका कशी होते ....?? त्यासाठी त्याला कोण मदत करतो ....?? डॅनी खरे अपराधी पुराव्यासहित  जगासमोर आणेल का ..?? कोण त्याला मदत करेल ...??? यासर्वाची उत्तरे पाहिजे असल्यास पुस्तक वाचवेच लागेल .
जेर्फी आर्चर यांनी अतिशय उत्कंठावर्धक पुस्तक लिहिले आहे . त्यांनी स्वतः काही काळ तुरुंगात काढला असल्यामुळे तेथील जीवनाचे अतिशय बारकाईने वर्णन केले आहे.

No comments:

Post a Comment