Thursday, August 8, 2019

फिफ्टी शेड्स डार्कर ....ई. एल. जेम्स

फिफ्टी शेड्स डार्कर ....ई. एल. जेम्स
अनुवाद .....डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके
मेहता पब्लिकेशन
फिफ्टी शेड्स सिरीजमधील हे पुस्तक.खरे तर हे दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक .सेक्सवर एखादा लेखक तीन पुस्तक कसे लिहू शकतो हेच आश्चर्यकारक आहे.
ख्रिश्चन ग्रे  एक तरुण श्रीमंत अविवाहित उद्योजक.त्याला आपल्याला पाहिजे त्या प्रकारात संभोग करायला आवडतो . त्यासाठी तो जो तरुणी निवडतो तिच्याशी कायदेशीर करार करून घेतो . बालपणीच्या काही वेदनादायक घटना या गोष्टीला कारणीभूत आहेत . तो त्या तरुणीला सबमासिव्ह म्हणतो . तिने फक्त त्याच्याशीच त्याला हव्या त्या पद्धतीने सेक्स करायचा आहे .त्यातच  अँनेस्टीया स्टील ही तरुणी त्याच्या आयुष्यात येते  आणि त्याची सबमासिव्ह  बनते.हळू हळू ख्रिश्चन ग्रे तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होतो .
खरे तर दोन पुस्तके वाचल्यावर तिसरे पुस्तक वाचण्यास अतिशय कंटाळा येतो . सतत सेक्स सेक्स. प्रेमाच्या गोष्टी . ग्रे च्या फँटसी . जिथे संधी मिळेल तिथे सेक्स करणे . त्याची विविध आसने ,त्यासाठी लागणारी वेगवेगळी हत्यारे वाचून उबग येतो . पुस्तकात रोमांचक अशी कथा नाहीच . आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या लोकांना दूर करणे हेच ग्रेचे काम . प्रेयसीला सतत उंची भेटवस्तू देणे ,चांगल्या हॉटेलात जेवायला घालणे आणि सेक्स करणे हेच पुस्तकात आहे .
पहिल्या पुस्तकात ग्रे तिला सबमासिव्ह म्हणून निवडतो आणि एक क्षणी ती त्याच्या हुकूमशाही पद्धतीला कंटाळून निघून जाते .
दुसऱ्या ह्या पुस्तकात तो तिला परत घेऊन येतो आणि शेवटी तिच्याशी लग्न करतो असे आहे
तिसऱ्या पुस्तकात लग्न झाल्यानंतर त्यांचा हनिमून आणि थोड्याश्या नाटकी घटना .
एकूण काय कोणतेही  पुस्तक कोणत्याही क्रमाने वाचले तरी तिसरे पुस्तक वाचायला कंटाळा येतो

No comments:

Post a Comment