Thursday, August 1, 2019

ग्रेट डायरेक्टर ..२

ग्रेट डायरेक्टर ..२
सर्गी आयझनस्टाईन (Sergei M.Eisenstein)
(1998 - 1948 ) रशिया
सर्गी आयझनस्टाईन एका श्रीमंत आर्किटेक्टचा मुलगा. त्याने सिव्हिल इंजिनियरिंग केले .१९१७ ला झारचा पाडाव झाल्यावर तो रेड आर्मीमध्ये अभियंता म्हणून सामील झाला .नंतर तो मास्को प्रोलेटकल थिएटरमध्ये सेट डिझायनर नंतर दिग्दर्शक म्हणून काम करू लागला . आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ सात चित्रपट केले .दुसऱ्या महायुद्धात त्याने इव्हान द टेरिबल (1944) भाग 1 व 2 हे चित्रपट काढले . यातील दृशे अप्रतिम आहेत आणि प्रत्येक चित्रपटप्रेमीने पहावा असा चित्रपट आहे.1925 ला प्रदर्शित झालेल्या बॅटलशीप पोटेकीन चित्रपटात रशियन जहाजावरील क्रू ची बंडखोरी चित्रित केली आहे . त्याशिवाय त्याचे 1927 साली प्रदर्शित झालेला ऑक्टोबर टेन डेज दॅट शॉक द वर्ड हाही चित्रपट प्रसिद्ध आहे .1941 आणि 1946 साली त्याला स्टॅलिन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले .

No comments:

Post a Comment