Friday, September 20, 2024

अग्लीस

UGLIES
 अग्लीस
ही कथा आहे भविष्यातील जगाची. नैसर्गिक स्रोत नष्ट झाले आहेत. त्यामुळे आता सर्व रेडिमेड मिळते. सिटी नावाचे जग आहे जे अतिशय सुंदर आहे.पण त्या जगात जाण्यासाठी सोळा वर्ष पूर्ण व्हावी लागतात .त्या आधी त्या मुलांना अग्ली म्हटले जाते.सोळा वर्ष पूर्ण झालेल्या तरुण तरुणींवर एक शस्त्रक्रिया केली जाते .त्यामुळे त्यांना आजुबाजूला फक्त आनंद दिसतो. त्यांच्यातील इतर भावना नष्ट होतात.
टॅली आता सोळा वर्षे पूर्ण करणार आहे .ती सिटीमध्ये जाण्यासाठी आतुर आहे.तिने तिच्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग ही निश्चित केलाय.त्या आधी तिचा मित्र पॅरिस सिटीमध्ये गेलाय आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झालीय.
शाय नावाची तरुणी आता टॅलीची मैत्रीण आहे .ती टॅलीला छापील पुस्तक वाचायला देते जे तिच्यासाठी नवीन आहे . मग ती तिला स्मोक या जगाविषयी सांगते .स्मोकमध्ये नातेसंबंध आहेत .तिथे पाणी आहे .लोक शेती करून अन्न पिकवतात .म्हणजेच तिथं नैसर्गिक स्रोत आहेत.पण सिटी  स्मोकला मानीत नाही .ते स्मोकला नष्ट करायला बघत असतात.डॉ.केबल सिटीची प्रमुख आहे .कोणावर शस्त्रक्रिया करायची हे तीच ठरवते.
डेव्हीड स्मोकमध्ये राहतो .तो बहुसंख्य तरुणांना स्मोकमध्ये आणायचा प्रयत्न करतो .शाय स्मोकमध्ये जाते.जाण्यापूर्वी ती टॅलीला स्मोकमध्ये जाण्याचा मार्ग सांगते.
एक अग्ली तरुणी नाहीशी झालीय हे  डॉ.केबलला समजते. ती टॅलीची शस्त्रक्रिया थांबविते आणि शायला स्मोकमधून परत आणायला सांगते .यासाठी पॅरिस डॉ केबलच्या पाठीशी असतो.
टॅलीमार्फत स्मोकचे ठिकाण समजले की सगळ्यांना बंदी बनवून स्मोक नष्ट करायची डॉ केबलची योजना असते.
टॅली शायला परत सिटीमध्ये आणेल का ??
डेविड स्मोकला वाचवू शकेल.
अत्याधुनिक तंत्रज्ञान विरुद्ध नैसर्गिक स्रोत यांची लढाई नक्कीच थरारक आहे.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.सहकुटुंबासोबत बघण्यासारखा हा चित्रपट सर्वाना आवडेल 

No comments:

Post a Comment