Thursday, September 19, 2024

द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह

द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
फ्रेडरिक फोरसिथ
अनुवाद ..रमेश जोशी 
राजहंस प्रकाशन 
एका छोट्या चुकीमुळे रशियातील गहू उत्पादनात घट झाली .आता रशियाला आपल्या एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे साडे पाच कोटी टन गहू कमी पडतोय .मोठया दुष्काळाला रशियाला सामोरे जावे लागणार आहे .ही गोष्ट अमेरिकेच्या फायद्याची ठरणार होती . ते गहू देण्याच्या मोबदल्यात अनेक फायदे आपल्या पदरात पाडून घेणार होते.
त्याचवेळी युक्रेनच्या स्वातंत्र्यची लढाई देखील चालू होती.आंद्रे ड्रेक हा इंग्लंडच्या मर्चंट नेव्हीच्या ऑफिसात काम करणारा साधा तरुण कारकून .पण तो खरा युक्रेनियन स्वातंत्र्यसैनिक होता .आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्याने काही साथीदारांना घेऊन एक भयानक योजना आखली .
त्याच्या योजनेनुसार केबीजी च्या प्रमुखाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पण त्यांच्या दुर्दैवाने रशियाने ही बातमी दडवून ठेवली .नंतर त्याच साथीदारांनी विमान अपहरण केले पण तोही डाव फसला आणि त्यांना अटक झाली .त्यांनीच केबीजी प्रमुखाला मारलंय हे रशियाला ठाऊक होते .त्यांची रवानगी तुरुंगात झाली.
जपानमध्ये  फ्रेया नावाचे एक महाकाय तेलवाहू जहाज बनतय.दहा लाख टन तेल वाहून नेण्याची क्षमता या जहाजात आहे .जगातील हे इतक्या क्षमतेच पहिलंच जहाज आहे .थॉर हा नॉर्वेजियन माणूस जहाजाचा कॅप्टन आहे.
दहा लाख टन क्रूड ऑइल भरून  फ्रेया प्रवासाला निघालीय .पण मध्येच ड्रेक आणि त्याचे साथीदार जहाजाचे अपहरण करतात. जहाजातील तेलाच्या टाक्यांना स्फोटके लावतात. ते तुरुंगात असलेल्या आपल्या साथीदारांची  सुटका करून  त्यांना  इस्त्रायला  पोचविण्याची मागणी करतात .
युरोपातील दहा देशांचे भवितव्य फ्रेयावर अवलंबून आहे.दहा लाख टन क्रूड ऑइल समुद्रात पसरले तर किती हानी होईल याचा विचार कोणीच करू शकत नाही .पण दोन कैद्यांची सुटका झाली आणि त्यांनी केबीजी प्रमुखाची हत्या केली आहे असे जाहीर झाले तर युक्रेनचा  स्वातंत्र्यलढा यशस्वी होईल आणि रशियाची नाचक्की होईल अशी भीती रशियाला आहे .आणि सध्या युक्रेनमध्ये जास्त गहू पिकतो .
शेवटच्या क्षणापर्यंत  चालणारे अपहरणनाट्य आपल्याला खिळवून ठेवते.
डोक्याला चालना देणारी एक थरारक कादंबरी .

No comments:

Post a Comment