Wednesday, October 10, 2018

पोखिला...अपहरणाचे 81 दिवस..…डॉ. विलास बर्डेकर

पोखिला...अपहरणाचे 81 दिवस..…डॉ. विलास बर्डेकर
सकाळ प्रकाशन
आसामी भाषेत पोखिला म्हणजे फुलपाखरू .फॉरेस्ट ऑफिसर असलेले लेखक डॉ. विलास बर्डेकर यांना फुलपाखरांचा अभ्यास करायचा छंद . त्या छंदापाई ते अरुणाचल प्रदेशमध्ये गेले . तिथे त्यांनापत्रकार समजून नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट फॉर बोडोलँड (NDFB) च्या दहशदवादी संघटनेकडून अपहरण केले गेले . त्या 81 दिवसाच्या कैदेतील वर्णन त्यांनी पुस्तकरूपाने मांडले आहे . चित्रपटात असते तसे काही थरारक नसते तर तीही सर्वसामान्य माणसे आहेत . पण तेथील वास्तव परिस्थिती फारच भयानक आहे  . तेथील भौगोलिक परिस्थिती ,वेळी अवेळी येणारा पाऊस .निबिड अरण्य . जळवा ,विषारी कीटक अश्या परिस्थिती लेखक त्यांच्यासोबत राहिले .दहशदवाद्यांकडून लेखकाला चांगली वागणूक मिळाली याचा त्यांनी  आवर्जून उल्लेख केला आहे .आपल्याला आसाम ,अरुणाचल प्रदेशाची चांगली माहिती मिळते . तसेच दहशतवादयांच्या मनाची ही कल्पना येते .

No comments:

Post a Comment