Sunday, October 7, 2018

कोमा.… रॉबिन कूक

कोमा.… रॉबिन कूक
अनुवाद .....रवींद्र गुर्जर
मेहता पब्लिकेशन
वैद्यकीय विश्वात खळबळ माजविणारी कादंबरी
डॉ. सुसान ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जॉईन होते . हे अतिशय नावाजलेले हॉस्पिटलमध्ये आहे . पण त्या हॉस्पिटलमध्ये अचानक एका वर्षात सहा पेशंट कोमामध्ये गेले आहेत . एक वीस वर्षीय खेळाडू गुढग्याच्या छोट्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जातो . त्या आधी ही नॅन्सी नावाची तरुणीही असेच  छोटे ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जाते . डॉ सुसान या घटनेच्या मुळाशी जायचे ठरविते . मग तिच्यावर संकटे कोसळू लागतात . तर दोनवेळा प्राणघातक हल्लाही होतो . हॉस्पिटलमधून तिची बदली होते . तरीही न डगमगता ती या प्रकरणाच्या मुळाशी जाते . सत्य समजताच तिला धक्का बसतो पण अजूनही तिला काही धक्के बसणार आहेत .आता तिचा  जीवच धोक्यात आहे . ज्या आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे घडतेय तिथेच तिला ऑपरेशनसाठी नेले जातेय . यातून कोण तिला वाचवेल .

No comments:

Post a Comment