Sunday, February 5, 2017

इराकहून सुटका ( मूळ पुस्तक BETRAYED) ....लतिफा अली आणि रिचर्ड शिअर  अनुवाद .. सिंधू जोशी 

इराकहून सुटका ( मूळ पुस्तक BETRAYED) ....लतिफा अली आणि रिचर्ड शिअर  अनुवाद .. सिंधू जोशी 
मुळातच लतिफा सनातन कुर्दी जमातीतील होती . सद्दाम हुसेनने त्यांच्या कुटुंबाचा वध करायचा आदेश दिल्यावर ते पळून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले.,मग त्या खुल्या वातावरणातच लतिफाचे तरुणपण गेले .पुढे तिच्या कुटुंबाने जर्मनीत स्थलांतर केले आणि वडील परत इराकला परतले . सनातन मुस्लिम चालीरीतीविरुद्ध वागल्याने तिला इराकला वडिलांकडे पाठविण्यात आले आणि तिथेच  जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले .एक मुस्लिम स्त्री म्हणून ती कोणाशी बोलू शकत नव्हती ,ना कोणत्याही दूतावसाशी संपर्क करू शकत होती .  तिच्या सुटकेच्या धडपडीमुळे तिचा छळ वाढत गेला. तसे तिने इराकी रूढी परंपरा आणि संस्कृती विरुद्ध जणू युद्धच पुकारले . तिचे सुटकेचे सारे प्रयत्न फोल ठरू लागले पण त्याही परिस्थितीत तिने हार न मानता युनो च्या लोकांशी जवळीक साधली आणि देशाच्या सीमेपर्यंत पोचली ,इराकच्या जुलमी चालीरीती आणि स्त्रियांना मिळणाऱ्या जुलमी वागणुकीची अंगावर शहारे आणणारी सत्यकथा

No comments:

Post a Comment