Friday, February 10, 2017

लाइक द फ्लोइंग रिव्हर

लाइक द फ्लोइंग रिव्हर ......पाउलो कोएलो ..अनुवाद .. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे
कोएलोच्या लघुकथा .जीवनाचे वेगवेगळे रंग दाखविणाऱ्या ह्या लघुकथा . कोएलोने आपल्या विचाराना मुक्त वाट करून दिली आहे .फ्लोईन्ग रिव्हर म्हणजे खळखळून वाहणारी नदी ,जी कुठेही थांबत नाही .फक्त वाहत राहते .त्याचप्रमाणे कोएलोचे विचार हि सतत चालत असतात .या कथा आहेत त्याच्या नशिबाच्या .त्याच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या घटनांच्या .काही मजेशीर गमतीदार,तर काही भावनिक  अंतर्मुख करणाऱ्या .पण आपल्याला जीवनातील सत्य उलगडवून दाखवितात . कोएलोने यात काहीही शिकवणूक दिली नाही ,त्याने कसलेही स्पष्टीकरण करण दिले नाही .तो फक्त लिहित राहिला .

No comments:

Post a Comment