Monday, February 13, 2017

जवान

कानावर हलकासा आवाज पडताच आबाजीने खाडकन डोळे उघडले आणि सवयीने  बाजूला रायफलसाठी हात घातला . ती हालचाल बघत असलेली बायको हसून म्हणाली "आहो त्या सीमेवर नाही आहात. आता घरी आरामात झोपलायत.रिटायर्ड होऊन 3 वर्ष झाली तरी बंदुकीची सवय गेली नाही . आबाजी गालात हसला ,खळखळून हसायची सवय नव्हतीच त्याला .तीही सैन्यातली सवय ,सर्व कारभार गुपचूप ,सावध,आपल्या हालचालींचा कोणालाही मागोवा लागू द्यायचा नाही हे अंगात भिनलेले . तो उठला ,नेहमीचे विधी आटपून तहसीलदार काचेरीकडे निघाला . गेले वर्षभर हेच काम होते त्याचे .त्याला पाहून जिल्हाधिकारी नेहमीप्रमाणे गोड हसला ,"या आबाजी ,बोला  काय काम "??? आबाजी हबकला "काय काम ?? आहो गेले वर्षभर एकाच कामासाठी तुमच्याकडे खेपा घालतोय " माझ्या जमिनीचे काम "?? हा हा हा !!ते होय ,होईल ना ,थोडी कागदपत्रे  यायची बाकी आहेत ,ती आली कि देतो ताब्यात जमीन तुमच्या ,आहो जमीन आहे ती ,कुठे पळून जाणार आहे का ?? असे म्हणून पुन्हा गोड हसला . आबाजी परत हताश होऊन फिरला .
कसा कारभार करतात हे लोक ?? सैन्यातून निवृत्त होण्यापूर्वी आबाजीला  4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल  शौर्यपदक मिळाले होते आणि जमीन .तीही अत्यंत वाजवी भावात पण आज वर्ष होत आले तरी जिल्हाधिकारी त्या जमिनीचा ताबा देत नव्हता ,रोज नवी कारणे .
हे काही आपल्याला पटत नाही ,आबाजी विचार करू लागला . त्याला आठवली ती रात्र .
दहशतवाद्यांच्या ठिकाणाची खबर येताच त्यांचा मुख्य अधिकारी म्हणाला होता एकही दहशतवाद्या ला  जिवंत सोडू अथवा पकडू नका .पकडलात तर त्याची सरबराई करण्यात दिवस जातील. आपल्याला कृती हवीय . हेच मनात ठेवून त्यांनी हल्ला केला . त्या पडक्या घरातून गोळीबार बंद होताच आबाजी आणि दुसरा जवान हातातील AK 47  सरसावत त्या घरात घुसले ,5 अतिरेकी मारून पडले होते त्यांच्या शरीराची गोळ्यांनी चाळण केली होती ,तर 4 जण हात वर करून उभे होते . 18 वर्षाचे कोवळे तरुण ,चेहऱ्यावर मृत्यूचे भय आणून थरथर कपात उभे होते .अबाजीच्या बरोबरच जवान हळहळला  ह्या कोवळ्या पोरानं ठार मारायचे ????? काय चुकी यांची ? कोणाची चूक कोण भोगतोय ..गोळ्या घालायला मन काही तयार होईना  अचानक त्यापैकीय एकाने पाठीमागे हात करून छोटे पिस्तूल काढले .चित्याप्रमाणे सावध असलेला आबाजी पुढे झाला .बंदुकीच्या एका फैरींत त्याने सर्वाना संपविले . कोऱ्या मनाने आबाजी युनिटकडे परतला जणू काही घडलेच नाही  .
त्या घटनेची दाखल घेऊन सरकारने त्याला शौरपदक जाहीर केले आणि हि जमीन . निवृत्त होऊन आबाजी जमिनीचा ताबा घ्यायला आला पण थोडे कागदपत्र बाकी आहेत म्हणू थोडे दिवस थांब असे सांगण्यात आले ,असे करत वर्ष झाले तरी जमीन अजून ताब्यात आली नाही  ."अरे काय चालू आहे हे ?? तो स्वतःशी पुटपुटला हेच दिवस बघायला का आम्ही माणसे मारणारी मशीन बनलो ,आमचे घर ,कुटुंब तुमच्या हवाली करून सीमेवर संपूर्ण देशाचे रक्षण करीत बसलो ,पण आज माझी जमीन मलाच मिळत नाही . रोज काही कारणे ,असा कारभार आम्ही केला असता तर हा देश परत गुलामगिरीत लोटला गेला असता .  खिन्नपणे तो बाजूच्या चहाच्या टपरीकडे वळला

No comments:

Post a Comment