Sunday, February 10, 2019

रक्तरेखा.....शशी भागवत

रक्तरेखा.....शशी भागवत
सायली प्रकाशन पुणे
कर्णओज नगरीतील स्मशानातील डोंबाची अशिक्षित कन्या सावरीला कधी कधी भयानक दृश्य डोळ्यासमोर दिसतायत.
कर्णओज नगरीच्या सम्राट हृदवर्मनला आज दुसऱ्या पत्नीपासून पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे .ज्योतिषाने मुलाचे भविष्य अचूक वर्तविले आहे आणि काश्मीरच्या बर्फाळ भागात खोल जमिनीच्या कुशीत दडलेली मयसभा सम्राट आपल्या मुलाला भेट देणार आहे.
मयसभेचे उत्खनन करून त्यातील अघोरी शक्ती जागृत करू नका असे थोर स्थापत्यकार अभेय मुख्य सचिवांना सांगतो पण ती राजाज्ञा आहे असे सांगून त्यास गप्प करतात .उत्खननात आपला  मृत्यू निश्चित आहे हे अभेयला माहीत आहे.
मुलगा झाल्याची बातमी ऐकून सम्राट आनंदाने राणीच्या महालात जातात आणि आतील दृश्य पाहून बेशुद्ध पडतात त्यानंतर ते भ्रमिष्ट होतात.
सम्राटांची पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी दूरच्या राज्यात एका आश्रमात राजनीती ,युद्धकला यांचे शिक्षण घेतेय. ती अतिशय शूर देखणी बुद्धिवान आहे.
सम्राट भ्रमिष्ट आणि महाराणी आजारी असल्याचे ऐकून त्यांच्या अधिपत्याखाली असणारी आणि रक्तरेखेतील नातलग विशिष्ट हेतूने कर्ण ओज नगरीत दाखल झालेत.प्रत्येकाच्या मनात स्वार्थ आहे ..विशिष्ट हेतू आहे .
महालात आणि रक्तरेखेतील व्यक्तींच्या बाबतीत जे काही अनिष्ट घडतेय ते सर्व सावरी स्मशानात बसून पाहतेय पण तिला नक्की काय केले पाहिजे हे सुचत नाही .
राजबालक हे साधे बालक नाही तर अघोरी शक्तींपासून निर्माण झालेले बालक आहे . पाच वर्षांनंतर त्याच्यातील अघोरी शक्ती पूर्ण विकसित होईल आणि पृथ्वीवर फक्त अघोरी शक्तींचेच राज्य चालेल.
बालक जन्माला येतात राज्यातील होम हवन, प्रार्थना ,भजने बंद झाली आहेत.
काही सामर्थ्यवान व्यक्ती  या दुष्टशक्तीपासून राज्याला आणि सम्राटांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत.
कोण आहे ती व्यक्ती जी महालातील गुप्तभागात  फिरून सर्वांचे संभाषण ऐकतेय आणि सम्राटांचे रक्षणही करतेय.महालातील सर्व गुप्तमार्ग त्याला ठाऊक आहेत.
कर्ण ओज नगरीतील ही अतिशय गुंतागुंतीची आणि अंगावर काटा आणणारी रक्तरेखा

No comments:

Post a Comment