Monday, February 4, 2019

माय फॅमिली इज ऑल आय हॅव...

माय फॅमिली इज ऑल आय हॅव... हेलन अँलिस डियर
अनुवाद......चित्रा वाळिंबे
मेहता पब्लिकेशन
1937 मध्ये कौटुंबिक सहल म्हणून इंग्लंडवरून हेलन आपल्या आजीला भेटायला आईबरोबर बल्गेरियाला आली .पण त्यानंतर परिस्थिती गंभीर बनत गेली . बल्गेरियातून बाहेरही पडता येत नाही आणि जगण्यासाठी रोजगार ही मिळत नाही .अश्या अवस्थेत आईने तिला सांभाळले.तिचा एक भाऊ बल्गेरियातून पळून गेला . परदेशी नागरिक म्हणून यांचा खूप छळ करण्यात आला . शेवटी यासर्व छळातून वाचण्यासाठी तिने नाईलाजाने बल्गेरियन मुलाशी लग्न केले . त्यापासून तिला चार मुले झाली .या चार मुलांना घेऊन गोठलेल्या थंडीत ती आयुष्यभर आसरा शोधत राहिली. दुर्दैवाने तिचा नवराही कुचकामी निघाला .त्यातच दुसरे महायुद्ध संपले आणि रशियनांनी बल्गेरियावर ताबा मिळवला.आधी नाझीवाद आणि आता साम्यवादाच्या दुष्टचक्रात ती भरडून निघाली . तब्बल पन्नास वर्षे तिने या देशात काढली . इंग्लंडला परत जाणाच्या आशा जवळजवळ नष्ट झाल्या होत्या . पण एके दिवशी 1989 ला बर्लिनची भिंत पाडली गेली.आणि तिचे स्वगृही जाणाच्या स्वप्नाला पुन्हा पालवी फुटली . खरेच गेली का ती परत स्वगृही .....??? एका स्त्रीची हृदद्रावक सत्यकथा .पण त्याचबरोबर जाणवतो आपल्या कुटुंबाबद्दल स्त्रीच्या मनात असलेली काळजी आणि जगण्यासाठी लागणारा कणखरपणा .तिने कधीच पराभव मान्य केला नाही . तिच्या असामान्य धीराची आणि सहनशील वृत्तीची ही कहाणी . प्रत्येक स्त्रीने वाचले पाहिजे असे पुस्तक

No comments:

Post a Comment