The Greatest Of All Time
द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम
गांधी आणि त्याचे मित्र सरकारच्या स्पेशल अँटी टेररिस्ट स्कॉडमध्ये काम करतात.अनेक खतरनाक ऑपरेशन्स त्यांच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.असेच एक ऑपरेशन ते केनियात पूर्ण करून येतात.या ऑपरेशनमध्ये मेमन मारला जातो .मेमन हा गांधींचा जुना बॉस आणि आता तो भारताचा शत्रू झाला आहे . गांधीला एक सहा वर्षाचा मुलगा आहे आणि आता त्याची पत्नी पुन्हा गरोदर आहे.गांधीने आपण काय काम करतो हे कुटुंबापासून लपवून ठेवले आहे.
थायलंडमध्ये एका मोहिमेसाठी गांधी आणि त्याच्या टीमची निवड होते.यावेळी गांधी आपल्या कुटुंबाला घेऊन जातो.पण तिथे त्याच्या मुलाचे अपहरण होते आणि गांधी नक्की काय काम करतो हे त्याच्या पत्नीला कळते आणि ती हादरते.
गांधींच्या मुलाचे प्रेत एका ब्लास्टमध्ये सापडते आणि गांधी कोसळून पडतो.तो आपली बदली इमिग्रेशनला करून घेतो.
या गोष्टीला सोळा वर्ष झालीत.गांधी आता कुटुंबापासून वेगळा राहतोय. त्याची पत्नी आपल्या सोळा वर्षाच्या मुलीसोबत राहतेय..त्याची पत्नी त्याच्याशी बोलत नाही . गांधी आता ऑफिस ड्युटी करतोय.
मास्को येथील वकीलातीत काही ऑफिसरला ट्रेनिंग देण्यासाठी गांधीची निवड होते.काम काही महिन्यासाठी आहे म्हणून गांधी मास्कोला जातो.अचानक तिथे त्याची भेट आपल्या मुलाशी झाली. जीवन गांधी आता मास्कोच्या गुन्हेगारी विश्वात अडकला आहे .तो वडिलांना आपल्याला यातून सोडविण्याची विनंती करतो.गांधी त्याला घेऊन भारतात येतो.
भारतात आल्यावर गांधीला मेनन जिवंत आहे असे कळते.इतकेच नव्हे त्याच्या बॉसकडे काही नवीन माहिती आहे हे कळते.तो आपल्या बॉसला भेटायला जातो पण त्याच्यासमोर एक बुरखाधारी तरुण बॉसची हत्या करतो .नंतर त्याच्या एका मित्राची हत्या होते.
कोणीतरी आहे जो गांधी आणि त्याच्या टीम च्या मागावर आहे.आता गांधीला पुन्हा स्कॉड जॉईन करण्याशिवाय पर्याय नाही .
चेन्नईत एक मोठा बॉम्ब ब्लास्ट करण्याची योजना आहे .पण ती कोण करतोय ? कुठे होणार आहे ? यात काही मोठ्या व्यक्ती सामील आहेत तर काही अनपेक्षित व्यक्ती ही यात असणार आहेत.
गांधी स्कॉडमधील गद्दाराना शोधून हे सर्व रोखू शकेल का ??
भरपूर हाणामारी ,सुसाट पाठलाग ,अंगावर काटा आणणारी दृशे आणि अप्रतिम vfx पहायचे असेल तर हा चित्रपट चुकवू नका.
मेगास्टार थलपती विजयने गांधी आणि जीवन असा डबल रोल केला आहे .प्रभुदेवा, प्रशांत, मोहन,जयरामने त्याला उत्तम साथ दिलीय.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment