Ajji
आज्जी
ती म्हातारी पाईपलाईनच्या लगतच्या झोपडपट्टीत राहत होती. मुलगा, सून आणि दहा वर्षाची छोटी नात मंदा हाच तिचा परिवार. मुलगा फॅक्टरीत काम करायचा. आज्जी घरात मशीनवर शिवणकाम करायची.
मंदा आजीला जमेल तितकी मदत करायची.वस्तीत सगळ्या प्रकारचे लोक राहत होते.त्यात धंदा करणाऱ्या बायकाही होत्या.पण सगळे मिळून मिसळून राहत होते.
त्या दिवशी रात्री मंदा एकीचा ब्लाउज द्यायला बाहेर पडली पण बराचवेळ झाला ती घरी आली नाही. शेवटी आजी बॅटरी घेऊन तिला शोधायला बाहेर पडली. तिच्या सोबत सून आणि वस्तीतील एक बाईही होती.शेवटी एका कचऱ्याच्या डब्यात मंदा जखमी अवस्थेत सापडली. सर्वजण मंदाला घरी घेऊन आले . एक इन्स्पेक्टर चौकशीसाठी आला.त्याने मंदावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.कोणी केले हे मंदाला माहीत नाही पण त्या व्यक्तीने काळा गॉगल घातला होता हे तिने सांगितले.
तो कोण आहे हे इंस्पेक्टर ओळखतो.तो याची तक्रार करू नका असा सल्ला देतो आणि उलट घरच्यांनाच बेकायदेशीर कृत्याखाली अडकवायची धमकी देतो.
वस्तीतील एक वेश्या आजीला तो काळ्या गॉगलवाला कोण आहे ते सांगते त्याचा बॅनरवरचा फोटो दाखविते. तो विलासराव ढवळे आहे.एक स्थानिक राजकारणी .त्याला कायद्याने शिक्षा करणे अवघड आहे.
पण आजी त्याला शिक्षा करण्याचे ठरविते आणि त्यासाठी ती काय काय करते हे पाहणे भीतीदायक आहे.
सुषमा देशपांडे आजीच्या प्रमुख भूमिकेत आहे .स्मिता तांबेने तिच्या सुनेची भूमिका केली आहे. अभिषेक बॅनर्जी विलासराव ढवळे बनला आहे.
चित्रपट आजीच्या हालचालीसारखा संथ सरकत जातो. पण यातील दृश्य अंगावर काटा आणणारी विकृत आणि रक्तरंजित आहेत.
No comments:
Post a Comment