Friday, October 4, 2024

गार्गी

Gargi
गार्गी
गार्गी एका शाळेत शिक्षिका आहे.घरी ती आई, वडील  आणि लहान बहिणीसोबत राहतेय.तिची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाहीय.तिचे वडील एका बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करतात.आई इडली डोस्याचे पीठ विकते .गार्गी घरी येऊन शिकविण्याही घेते.
गार्गीच्या विभागात एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला होता.पोलिसांनी चार परप्रांतीयांना पकडले होते. आज त्यांनी अजून एका आरोपीला पकडले.एकूण पाचजणांनी तिच्यावर अत्याचार केला होता.ओळख परेडमध्ये तिने पाचव्या आरोपीला ही ओळखले.गार्गी त्या दिवशी वडिलांची वाट पाहून शेवटी एकटीच घरी आली .वडिलांचा फोन स्विच ऑफ येत होता.शेवटी ती पोलीस स्टेशनला गेली तेव्हा तिचेच वडील पाचवे आरोपी आहेत हे ऐकून हादरून गेली.
कोणीतरी ही बातमी मीडियामध्ये पसरवली आणि सगळा समाज एका क्षणात गार्गी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गेला.गार्गीची नोकरी गेली.ट्युशन बंद झाल्या . 
वकील असोसिएशनने तिच्या वडिलांची केस कोणी घेऊ नये अशी नोटीस काढली .तिला कोणीच वकील मिळेना.
इंद्रान्स कालियापेरूमल हा एक ज्युनियर वकील .एका मोठ्या वकिलाचा सहाय्यक म्हणून काम करतो. फावल्या वेळात तो एका मेडिकल दुकानात विक्रेता म्हणूनही काम करतो.  तो बोलताना मध्येच अडखळतो .तो गार्गीचे वकीलपत्र स्वीकारतो. गार्गीलाही पर्याय नसतोच. 
शेवटी केस कोर्टात उभी राहते.
गार्गीचे वडील खरेच अपराधी आहेत का ? गार्गी आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी काय काय प्रयत्न करते ?? 
गार्गीच्या भूमिकेत सई पल्लवीने अप्रतिम काम केलंय.तिचा हतबलता वेळ आल्यावर कठोरपणे वागणे. अगदी मूर्तिमंत उभे केलंय.
यात उठून दिसतो तो वकील इंद्रान्स झालेला काली वेंकट .याचा साधेपणा ,निरागस चेहरा भावतो. हातात काही नसताना तो कोर्टात उभा राहतो आणि योग्य वेळी डाव टाकतो.
यात हिंसा नाही ,रक्तपात नाही ,धमकावणी नाही .एक सरळ साधा चित्रपट आहे जो एका अनपेक्षित वळणावर थांबतो.
चित्रपट झी 5 वर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment