The Shadow Strays
द शॅडो स्ट्रयस
तिचे नाव नंबर तेरा आहे.इंडोनेशियातील शॅडो संघटनेतील एक प्रशिक्षित मारेकरी आहे.शॅडो संघटना कॉन्ट्रॅक्ट घेऊन माणसे ठार मारायची कामे करते. त्यांच्याकडे अनेक मारेकरी आहेत जे कुठेही जाऊन क्रूरपणे आपल्या सावजाला मारतात.
पण त्या दिवशी इंडोनेशियातील एका मोठ्या डॉनला मारायची कामगिरी तेरा नंबरला दिली होती.तिने त्या डॉनला संपविले पण एक छोटी चूक तिच्या हातून घडली.त्यामुळे तिला अनिश्चित काळ निलंबित करण्यात आले.
नंबर तेरा आता एका चाळीत राहतेय.तिच्या शेजारी एक तरुण स्त्री आणि तिचा बारा वर्षाचा मुलगा मांजो राहतो. त्या स्त्रीला ड्रगची सवय आहे .
एके रात्री काही गुंड तिचा खून करतात. मांजो आता एकटा पडलाय . नंबर तेरा त्याच्यासोबत मैत्री करते.तिला त्याचा लळा लागतो . पण एके दिवशी त्याचे अपहरण होते.त्याचा शोध घेताना नंबर तेरा एका मोठ्या माफिया संघटनेच्या मुळाशी जाते.
तेरा नंबरने नियम तोडल्यामुळे शॅडो संघटना चिडली आहे.तिचे मारेकरी आता तिच्या मागावर आहेत.
तेरा नंबर गुंडांच्या तावडीतून मांजोला सोडवेल का ?? शॅडो तेरा नंबरला ठार करेल ??
ज्यांनी किल चित्रपट पाहिला आहे तेही हा चित्रपट पाहून हादरतील इतका रक्तपात आणि हाणामारी या चित्रपटात आहे.या चित्रपटात नायक नाही तर एक कोवळी तरुणी नायिका आहे.ती मारही भरपूर खाते आणि क्रूरपणे आपल्या शत्रूला मारतेही .
रक्ताच्या चिळकांड्या उडणे म्हणजे काय ते या चित्रपटात पाहायला मिळते. ज्यांना रक्तपात ,हिंसाचार आवडत नाही त्यांनी हा चित्रपट पाहू नये.शत्रूला क्रूरपणे ठार कसे मारतात ते ह्या चित्रपटात पाहायला मिळते.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment