MIDNIGHT AT PERA PALACE
मिडनाईट एट पेरा पॅलेस
इस्तंबूलमधील हॉटेल पेरा पॅलेसचे 130 वे वर्ष आहे आणि त्या हॉटेलची बातमी करण्यासाठी इसरा या पत्रकार तरुणीची निवड होते. इसरा अगाथा ख्रिस्तीची मोठी चाहती आहे. असे म्हणतात 1919 साली अगाथा ख्रिस्तीने याच हॉटेलमध्ये तिची सुप्रसिद्ध मर्डर इन ओरियंटल एक्सप्रेस कादंबरी लिहिली होती आणि ती मध्येच आठ दिवस गायब झाली होती.
अहमद हा वयस्कर माणूस पेरा पॅलेसचा मॅनेजर आहे.तो इसराला सर्व हॉटेल फिरून दाखवतो .जिथे आगाथा ख्रिस्ती थांबली होती ती खोलीही दाखवितो. पण आगाथा आठ दिवस कुठे गायब झाली होती ते सांगत नाही.त्याच वेळी तिला एक जुनी हॉटेलच्या रूमची चावी दाखवितो.
मध्यरात्री इसरा अगाथा ख्रिस्तीच्या रूममध्ये जाते तेव्हा तिथे एक चावी ठेवलेली असते .इसरा ती चावी हातात घेते आणि घड्याळात बारा वाजतात. त्याचवेळी एक छोटे वादळ त्या खोलीत येते.चावी घेऊन ती रूमच्या बाहेर पडते तेव्हा विचित्र पोशाखातील स्त्री पुरुष हॉटेलमध्ये दिसतात.तिला तेथे अगाथा ख्रिस्तीही भेटते. इसरा टाईम ट्रॅव्हलकरून भूतकाळात 1919मध्ये पोचलेली असते..
1919 ला तुर्कस्तानात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ चालू आहे. बंडखोर नेत्यांचे बंड यशस्वी झाले तर तुर्कस्थान स्वतंत्र होणार आहे.पण तिथे दुसरी इसराही हजर आहे. आताची इसरा काही गुपिते ऐकते आणि तिचे तोंड बंद करण्यासाठी दुसऱ्या इसराला पेरा पॅलेसच्या खोलीत मारले जाते.
त्याचवेळी अहमदही 1919च्या काळात येतो आणि इसराचा खून होणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे हे आताच्या इसराला सांगतो.हा खून उघडकीस आला तर तुर्कस्थान स्वतंत्र होणार नाही असे सांगतो.मग आताच्या इसराला भूतकाळातील इसरा बनायला सांगतो.
पण इसराला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही.ती तिचे सोंग वठवू शकेल का ?? ती पुन्हा वर्तमानात येईल का ?? पेरा पॅलेसमध्ये नक्की काय घडते .तिथल्या टाईम ट्रॅव्हलचे रहस्य काय आहे.
दोन सिझन मध्ये असलेली ही रोमांचक मालिका नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment