Mowgli: Legend of the Jungal
मोगली : लिजंड ऑफ द जंगल
रुडीयार्ड किपलिंगचे जगप्रसिद्ध पुस्तक जंगल बुक सगळ्यांना परिचित आहे.त्यातील मोगली ,शेरखान ,बगिरा पात्रे आपल्या जवळची झाली आहेत. ऑल द मोगली स्टोरीस या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.
शेरखान नावाचा प्रचंड शक्ती असलेला क्रूर वाघ जंगलाचे नियम मानीत नाही.तो गावात घुसून मानवांवर हल्ले करतो. पाळीव पशूंना मारतो. तो मोगलीच्या आईवडिलांनाही मारतो. काळा चित्ता बगिरा छोट्या मोगलीला घेऊन लांडग्यांच्या कळपात येतो. टोळीचा प्रमुख अकिला मोगलीला राहण्याची परवानगी देतो आणि निशा त्याला वाढविण्याची जबाबदारी घेते.
मोगली आता सातआठ वर्षाचा झालाय.तो स्वतःला लांडगाच समजतो. बालू नावाचा महाकाय अस्वल त्याचा शिक्षक आहे.तो मोगलीला जंगलाचे कायदे, नियम शिकवतो.
बगिराची इच्छा आहे मोगलीने त्यांच्या माणसात परत जावे.
शेरखान परत जंगलात येऊन मोगलीवर हल्ला करतो. स्वतःला वाचवताना मोगली गावात शिरतो. गावकरी त्याला आपले मानतात.तो हळूहळू त्यांच्यात रमू लागतो .पण शेरखान जंगलात धुमाकूळ घालतो त्यामुळे मोगलीला पुन्हा जंगलात जावे लागते.
मोगली आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा बदला घेईल का ? जंगलात पुन्हा कायद्याचे राज्य निर्माण होईल ?
अप्रतिम vfx असलेला हा चित्रपट सर्वानाच आवडेल .
रोहन चांद हा बाल कलाकार मोगलीच्या प्रमुख भूमिकेत आहे .
फरीदा पिंटो गावातील तरुणीच्या छोट्या भूमिकेत आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment