The Mystery Of Moksha Island
द मिस्ट्री ऑफ मोक्ष आईसलँड
अंदमानच्या बाजूलाच अनेक बेटांमध्ये मोक्ष नावाचे छोटे बेट आहे.ते बेट जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विश्वाक सेनचे आहे. डॉ. सेन यांनी वैद्यकीयशास्त्रात अनेक शोध लावले आहेत .ते मोठ्या फार्मा कंपनीचे मालकही आहेत. सध्या ते एका महत्त्वाच्या गोष्टीवर गुप्त संशोधन करतायत.पण अचानक त्यांचा मोक्ष बेटावर रहस्यमय अपघाती मृत्यू होतो.
काही दिवसांनी देशातील विविध भागात राहणाऱ्या कुटुंबांना डॉ .सेनच्या कंपनीतून मोक्ष बेटावर येण्याचे अधिकृत आमंत्रण येते. ही सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे डॉ. सेनशी संबंधित आहेत. मोक्ष बेटावर त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाते आणि सात दिवस जो बेटावर राहील त्याला डॉ. सेनची संपूर्ण संपत्ती आणि कंपनीची मालकी मिळेल असे डॉ. सेनची सेक्रेटरी जाहीर करते.
डॉ. सेन यांचे अनेकजणांशी अनैतिक संबंध होते. त्यांची अनेक कुटुंब आहेत. मुले आहेत ,इतकेच नव्हे तर नातवंडे देखील आहेत. त्यात काही गरीब आहेत तर काही श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय देखील आहेत. सर्वाना त्याच्या संपत्तीची हाव सुटते.पण त्यातूनच भयानक प्रसंग घडत जातात. आता त्या बेटावर राहणे धोक्याचे झाले आहे. त्याबेटावरून बाहेर कोणाशीच संपर्क साधू शकत नाही.तिथे मोबाईल नेटवर्क नाही .सर्व नोकर जणू यंत्र मानव आहेत.
असे कोणते संशोधन डॉ. सेन करीत होते आणि आता त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण झाली आहे.
अगाथा ख्रिस्तीच्या पाषाण या कादंबरीची आठवण करून देणारी ही रहस्यमय थ्रिलर सिरीज हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहेत.
आशुतोष राणाने डॉ. सेनची महत्वपूर्ण भूमिका केली आहे .बाकी चेहरे फारसे ओळखीचे नाहीत.पण सिरीज पाहताना उत्कंठा वाढत जाते.
No comments:
Post a Comment