Golam
गोलम
व्ही टेक इंटरनॅशनल ही छोटी आय टी कंपनी. यात सगळे मिळून सोळा कर्मचारी आहेत. आयझॅक जॉन कंपनीचा एमडी आहे आणि तो व्ही लॅब या फार्मा कंपनीचा भागीदारही आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांचे नेहमीचे रुटीन चालू असते. कंपनीतर्फे सर्वाना चहा बिस्कीट देण्यात येतात. एन्ट्री करायला बायोमेट्रिक पंचिंग मशीन आहे.
नेहमीप्रमाणे कंपनीत रुटीन चालू आहे. पण आज जॉन कॉफी पॅन्टवर सांडल्यामुळे त्याच्या खाजगी टॉयलेटमध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही.सगळ्यांनी त्याला हाका मारल्या पण उत्तर मिळाले नाही.वॉचमनकडून दुसरी चावी आणली गेली आणि दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये जॉन मरुन पडला होता.
सगळ्यांना वाटले की जॉन पाय घसरून पडला आणि त्याचे डोके फुटले . पण पोलीस अधिकारी संदीपला पक्की खात्री आहे की ही हत्या आहे.
त्याने सर्व स्टाफला बाहेर जाण्यास मनाई केली आणि प्रत्येकाची चौकशी सुरू केली. पण त्यातून वेगळेच सत्य बाहेर आले.
हे सत्य भयानक आणि डोके सुन्न करणारे आहे .इंस्पेक्टर संदीप ही हत्या आहे हे सिद्ध करेल का ??
हा चित्रपट आगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेसारखा आहे.अतिशय शांतपणे कुठेही आरडाओरड न करता या प्रकरणाचा तपास चालू आहे. उगाच कोणाच्या अंगावर धावून जाणे नाही की घसा ताणून कोणावर ओरडणे नाही.फक्त चौकशी चालू आहे आणि त्यावरून तर्क मांडले जातायत .
याचा दुसरा भाग ही येणार हे चित्रपटाच्या शेवटी कळते.
ज्यांना मर्डर मिस्टरी पहायची आवड असेल त्यांनी नक्की हा चित्रपट पहा.
No comments:
Post a Comment