Wednesday, October 2, 2024

औरो मे कहा दम था

AURON MEIN KAHAN DUM THA
औरो मे कहा दम था
कृष्णा हार्डवेअर इंजिनियर .मुंबईच्या चाळीत एकटाच राहतो. तो आणि वसुधा एकमेकांवर खूप प्रेम करतात. ते दोघेही लवकर लग्न करणार आहेत. वसुधाही त्याच चाळीत आपल्या कुटुंबासोबत राहते. पण अचानक काही असे घडते की कृष्णाला दोन हत्यांच्या आरोपाखाली अटक होते आणि आजन्म कारावासाची शिक्षा होते.
आता 2024 चालू आहे .कृष्णा तुरुंगात आहे. तिथे त्याला खूप मान आहे आणि तितकीच त्याची दहशतही . त्याने गँगस्टर महेश देसाईचे तुरुंगात रक्षण केले होते . वसुधा त्याला तुरुंगात कधीही भेटायला आली नाही .पण कृष्णाचा जिवलग मित्र जिग्नेशमार्फत तिला त्याची सगळी माहिती कळते.
 आज कृष्णा तुरुंगातून सुटणार आहे .त्याची सजा अडीज वर्षांनी कमी केली आहे.कृष्णाला तुरुंगातून बाहेर पडायचे नाही.तसेही बाहेर जिग्नेशशिवाय कोणीच जवळचे नाही .वसुधाने कृष्णाच्या सांगण्यावरून लग्न केले . ती आता टॉपची डिझाईनर आहे.तिचा नवरा अभिजितही समाजात प्रतिष्ठित व्यक्ती आहे.
महेश देसाईला फोन करून कृष्णा त्याला दुबईत स्थायिक होण्यासाठी मदत मागतो .तो तुरुंगातून बाहेर पडतो तेव्हा जिग्नेश बाहेर उभा असतो .तो त्याला जुन्या चाळीत घेऊन जातो .तिथे वसुधा येते आणि त्याला आपल्या घरी घेऊन जाते .तिथे तो अभिजितला भेटतो ..
पुढे काय घडते यासाठी हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर पहावा लागेल .
असे काय घडते की कृष्णाला दोन हत्या कराव्या लागतात ?
नीरज पांडे ने चित्रपट दिग्दर्शित केला आहे.अतिशय सरळ साधी पण एका मार्गावर अनपेक्षित वळण घेणारी ही प्रेमकथा आहे.
तरुणपणीचे कृष्णा आणि वसुधा शंतनु महेश्वरी आणि सई मांजरेकरने साकारल्या आहेत.तर नंतर अजय देवगण आणि तब्बूने या भूमिका केल्या आहेत.सयाजी शिंदेने महेश देसाईची छोटी भूमिका केली आहे. जय उपाध्याय जिग्नेश बनला आहे.

No comments:

Post a Comment