Saving Private Ryan
सेविंग प्रायव्हेट रायन
युद्ध कोणालाच नको असते.विशेषतः युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकांना तर नकोच असते.इथे मृत्यू कधी येईल ते सांगू शकत नाही .आला तर पटकन येईल की वेदनादायक असेल हेही कोणी सांगू शकत नाही.दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिक वेगवेगळ्या आघाड्यांवर मारले गेले.
कॅप्टन जॉन मिलर अश्याच एका आघाडीवर आपल्या तुकडीसोबत लढतोय. बोटीतून किनाऱ्यावर उतरताना त्याच्यावर जर्मन सैनिकांचा हल्ला झाला.तो हल्ला खूपच वेगवान होता.त्यातून कसेबसे वाचून शेवटी त्यांनी जर्मनांवर विजय मिळवला पण यात बऱ्याच सैनिकांचा भयानक मृत्यू झाला होता.
सैन्यदलाचे पोस्ट ऑफिस अमेरिकेत आहे.मृत्यू पावलेल्या सैनिकांची माहिती ते पत्राद्वारे त्यांच्या घरी कळवितात. त्या दिवशी पोस्टखात्यात एका कर्मचारी स्त्रीला तीन पत्रे सापडली.तिन्ही पत्रे एकाच घरात जाणार होती. होय रायन कुटुंबातील एका महिलेला तिची तीन मुले युद्धात मरण पावली अशी ती पत्रे होती.
तिने ती पत्रे आपल्या सिनियर ऑफिसरला दाखवली त्याच वेळी त्या महिलेचा चौथा मुलगाही युद्ध लढतोय असे समजले. ही बातमी वरिष्ठांपर्यंत पोचते आणि चौथ्या रायनला असेल तिथून जिवंत परत आणा अशी ऑर्डर निघते.
कॅप्टन जॉन मिलरला रायनला शोधून जिवंत परत आणायची जबाबदारी टाकण्यात येते.कॅप्टन मिलर आपल्या आठ सैनिकांसह रायनला शोधायला निघतो.
कॅप्टन जॉन मिलर रायनला त्या अफाट युद्धभूमीवर शोधून काढेल का ?? त्यासाठी त्याला कोणती किंमत मोजावी लागेल ?
स्टीवन स्पिलबर्ग दिग्दर्शित हा युद्धपट आपल्या अंगावर काटा आणतो. यातील युद्ध नकोसे वाटते.एक गोळी कुठूनही येईल आणि आपला घास घेईल असे प्रत्येक सैनिकाला वाटते. बॉम्बस्फोटात आपल्या शरीराचा कोणता भाग नाहीसा होईल हे कोणालाच माहीत नाही .तर शेजारील सैनिकांशी बोलताना एक गोळी कधीही कपाळात शिरून क्षणात मृत्यू येईल याची कल्पना ही तो करू शकत नाही.
टॉम हँक्सने कॅप्टन जॉन मिलरच्या प्रमुख भूमिकेत जीव ओतला आहे.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment