Khel Khel Main
खेल खेल मे
मोबाईलने सर्वांच्या आयुष्यात क्रांती आणली आहे. काहीजणांनी फसवणुकीसाठी तर काहींनी फायद्यासाठी वापर केला. असेच काही उच्चभ्रू मित्र लग्नासाठी जयपूरला आपल्या फॅमिलीसोबत एकत्र आलेत.
डॉ. ऋषभ मलिक एक सर्जन आहे .तो अतिशय सफाईने खोटे बोलतो.त्याची पत्नी वर्तिका लेखिका आहे.दोघांच्यात थोडा तणाव आहे.त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे.
कबीर देशमुख प्रसिद्ध क्रिकेट कोच आहे.तो एकटाच लग्नाला आलाय.
हरप्रित सिंहची गाड्यांची डीलरशिप आहे.त्याची पत्नी हॅप्पी साधी गृहिणी आहे.
समर तन्वर आपल्या सासर्याच्या कंपनीत ब्रँड मॅनेजर आहे .त्याची नैना एका ब्युटीकची मालकीण आहे.
हे सर्व वर्तिकाच्या बहिणीच्या लग्नाला जयपूरला एकत्र येतात.गप्पा मारताना वर्तिका सर्वांसमोर एक खेळ खेळायची योजना मांडते.त्यानुसार सर्वांनी आपले मोबाईल टेबलवर ठेवायचे आणि प्रत्येकाच्या फोनवर येणारे मेसेज ,इमेल ,फोन कॉल उघडपणे वाचायचे .
गंमत म्हणून सुरू झालेला हा खेळ प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा कसा ठरतो हे चित्रपटातच बघावे लागेल.
या चित्रपटातील संवाद अतिशय प्रभावशाली आहेत.कधी कधी हसू येते तर कधी गंभीर होतो.
अक्षयकुमार, फरदिन खान, तापसी पनू , वाणी कपूर ,आदित्य सील, प्रमुख भूमिकेत आहेत.
No comments:
Post a Comment