Tuesday, October 8, 2024

ट्रबल

TROUBLE
ट्रबल
कॉनी टीव्ही विक्रेता  आणि इंस्टोलेशनचे काम करतो. त्याला छोटी मुलगी आणि पत्नी आहे. पण सध्या त्यांची डिव्होर्स प्रक्रिया चालू आहे .
त्या दिवशी तो एका व्यक्तीकडे टीव्ही इंस्टोलेशन करायला गेला होता . पण त्याच वेळी त्याच्या मागे त्या व्यक्तीचा खून झाला आणि खुनी कॉनीला बेशुद्ध करून निघून गेला.
त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपाखाली कॉनीला अटक झाली.पण मरताना त्या व्यक्तीने कॉनीच्या कानात आपल्या फोनचा उच्चार केला होता.
कॉनीच्या विरुद्ध मजबूत  पुरावा  होता. वकीलही फार काही करू शकला नाही .पोलिसांना त्या व्यक्तीचा फोन सापडला नाही.कॉनीला पंधरा वर्षाची सजा झाली.
तुरुंगात कॉनीला कपडे धुण्याचे काम मिळाले.तिथल्या एका वॉशिंग मशीनमधून भुयारी रस्ता आहे ज्यातून बाहेर जाता येते.कॉनी त्यातून बाहेर पडतो आणि फोन शोधायला त्या व्यक्तीच्या घरी जातो आणि त्याच्या पत्नीला फोन किती महत्वाचा आहे ते सांगतो.
योगायोगाने तिला फोन सापडतो .तो फोन ती टीव्हीला लावून आतील व्हिडिओ पाहते आणि हादरून जाते. त्याचवेळी खरे खुनी तिच्या मागे लागतात .
ती तो फोन कॉनीला देण्याचा प्रयत्न करते पण यात खूप अडचणी आहेत.कॉनी तुरुंगातून भुयारी मार्गद्वारे बाहेर पडतो पण पोलीस त्याच्या मागावर आहेत .
कॉनी तो फोन ताब्यात घेऊन आपले निरापराधित्व सिद्ध करेल का ??
हा कॉमेडी थ्रिलर  चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.सर्वांनी मिळून पहावा असा हा चित्रपट आहे .

No comments:

Post a Comment