The Strangers : Chapter 1
द स्ट्रेंजर : चॅप्तर 1
माया आणि रायनची एकत्र राहण्याचे पाचवे वर्ष आहे त्यानिमित्ताने दोघेही तीन दिवस कारने बाहेर फिरतायत. फिरत असताना ते व्हीनस गावात शिरतात.या गावात एकूण साडेचारशे लोकवस्ती आहे. गाव थोडे विचित्र दिसतेय.माया आणि रायन लंच करून बाहेर पडतात आणि त्यांची गाडी बिघडते. सुदैवाने तिथे मेकॅनिक असतो पण तो गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी मिळेल असे सांगतो. गावात राहण्यासाठी हॉटेल नाही पण एक रिकामा बंगला आहे. तो बंगला एका शिकाऱ्याचा आहे.
दोघेही त्या बंगल्यात एका रात्रीसाठी थांबायचे ठरवितात .पण त्या बंगल्यात काही विचित्र घडतेय.दोघांच्या हालचालीवर कोणाचेतरी लक्ष आहे.
अचानक तीन मुखवटे घातलेल्या व्यक्ती त्यांच्या मागे लागतात.
पुढे काय होईल ??
माया आणि रायन त्यांच्याशी लढा देऊन स्वतःची सुटका करून घेतील ??
एका रात्रीत घडलेली ही अंगावर काटा आणणारी घटना आपण श्वास रोखून पाहतो .चित्रपट नेहमीच्या भयपटासारखा संथ आहे.पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत जाते.
याचा दुसरा भाग येणार असल्यामुळे हा चित्रपट अपूर्ण सोडला आहे.
No comments:
Post a Comment