KILL
किल
रांची स्टेशनवरून दिल्लीला जाण्यासाठी बलदेवसिंह ठाकूरची फॅमिली ट्रेनमध्ये चढते.बलदेवसिंहच्या कुटुंबात त्याची आई ,पत्नी आणि दोन मुली आहेत.ते झारखंडमधील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जातात.त्यांची मुलगी तुलिका अमरीत राठोडवर प्रेम करते. अमरीत भारतीय सैन्यात एनएसजी कमांडो आहे.
अमरीत आपल्या मित्रासोबत त्याच ट्रेनमधून प्रवास करतोय. ट्रेनने रांची सोडले आणि काही अंतर जाताच सशस्त्र गुंडांनी ट्रेनमधील प्रवाश्याना लुटायला सुरवात केली.
यापुढे सुरू होतो फक्त रक्तपात .अमरीत आणि त्याचा मित्र गुंडांना प्रतिकार करायला सुरुवात करतात. पण गुंड तीन डब्यात पसरलेले आहेत .कमीतकमी चाळीसजण आहेत असे त्यातील एक सांगतो .गाडी क्रॉसिंगला हळू होते तेव्हा आणखी गुंड शिरतात.त्यांच्याकडे बंदुका नाहीत पण सुरे कोयते आहेत आणि त्यामुळेच जास्त रक्त सांडते.
यात मुख्य आकर्षण आहे फनी .हा फनी नावाप्रमाणेच फनी आहे पण अतिशय क्रूर आहे.तो समोरच्याला चिडवून मारतो .राघव जुयलने हा चीड आणणारा खलनायक रंगविला आहे.
धावत्या ट्रेनमध्ये तीन डब्यात हे रक्तरंजित नाट्य सुरू असते .यात कधी खलनायक बाजी मारतात तर कधी नायक.
ह्यातील सीन प्रचंड प्रभावी आहेत .नायकही भरपूर मार खातो आणि क्रूरपणे समोरच्याला ठारही मारतो.
No comments:
Post a Comment