Haseen Dillruba
हसीन दिलरुबा
राणी थोडी चंचल आहे. आतापर्यंत तिचे दोन बॉयफ्रेंड झालेत. रहस्यकथा वाचायचा तिला नाद आहे.फावल्या वेळात ती ब्युटीशीयनचे काम करते.
रिषभ सक्सेना तिला पाहायला येतो. तो इलेक्ट्रिसिटी बोर्डात इंजिनियर आहे. खूप साधा माणूस. राणीच्या विरुद्ध स्वभावाचा. तरीही राणीचे आणि त्याचे लग्न होते. राणीच्या स्वभावाला रिषभचे घर मॅच होत नाही तरीही ती ऍडजस्ट करत राहते. त्यात एक दिवस रिषभचा मावसभाऊ नील तिच्या आयुष्यात येतो.
एके दिवशी संध्याकाळी राणी खरेदीसाठी बाहेर पडते. रिषभही काही खरेदी करून नुकताच घरी आलेला असतो. रिषभचे आईवडील बाहेरगावी गेलेले असतात त्यामुळे घरात कोणीच नसते. खरेदी करून राणी घराजवळ येते. तिने घेतलेल्या मटणाचे काही तुकडे ती कुत्र्यांना खायला देत असतानाच घरात सिलिंडरचा स्फोट होतो. ती हादरून घरात शिरते तेव्हा एक जळलेला हात सापडतो . त्यावर राणी नाव पाहताच तो रिषभ आहे याची खात्री तिला पटते.
इन्स्पेक्टर किशोर रावत या प्रकरणाचा तपास करतोय. त्याला खात्री आहे की यामागे राणीचा हात आहे. पण राणी आरोप नाकारते. तिच्या विरुद्ध एकही पुरावा त्याला सापडत नाही .नाईलाजाने तो ही केस बंद करतो.
पाच वर्षानंतर त्याची बदली होते आणि रेल्वे स्टेशनवर त्याला एक पुस्तक दिसते. त्याच नावाचे पुस्तक रिषभच्या घरी असते. तो पुस्तक वाचतो आणि खरे काय घडले असेल हे कळून चुकते.
तापसी पनू, विक्रात मेसी आणि हर्षवर्धन राणे यात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अदित्य श्रीवास्तवने इन्स्पेक्टर रंगविला आहे.
चित्रपटाचे नाव जरी हसीन दिलरूबा असले तरी चित्रपट मात्र रहस्यमय आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा आहे.
याचा दुसरा भाग ही आलाय पण हा चित्रपट पाहिल्याशिवाय दुसरा भाग बघू नये.
No comments:
Post a Comment