MURSHID
मुर्शीद
मुर्शीद पठाण मुंबईच्या अंडरवर्डचा माजी डॉन. एके काळी त्याने मुंबईवर राज्य केले होते. पण त्याचा मोठा मुलगा मारला गेला आणि त्याने शस्त्र खाली ठेवले. आपला उजवा हात फरीदच्या हाती कारभार सोपवून निवृत्त झाला .आता तो शांतपणे आपले निवृत्त आयुष्य जगतोय. सर्वाना मदत करतोय. मोठा मुस्लिम समुदाय त्याच्या पाठीशी उभा आहे.
फरीद तालिबानी लोकांकडून ड्रगची डिलिव्हरी घेतो.याकामी तो नवीन तरुण मुलांची निवड करतो.त्या दिवशी ड्रग आणायची पाळी सलीम आणि जुनेदची होती.डिलिव्हरी घेताच सलीमने तालिबानी गुंडांना मारले .जुनेद पळून गेला आणि महेश भाई जो फरीदचा उजवा हात आहे त्याच्याकडे आला .पण डिलिव्हरी आणि पैसे घेऊन सलीम गायब झाला .जुनेदला ड्रग आणि सलीमसाठी खूप मारहाण करण्यात आली .फरीदने जुनेदला पाहिले आणि तो हादरला .जुनेद मुर्शीदचा मुलगा होता.
मुर्शीद चिडला तर तो सगळ्यांना भारी पडेल याची कल्पना फरीदला होती.पण फरीदच्या पाठी मुख्यमंत्री होते.आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा जयेंद्र आता निवडणुकीला उभा राहून भावी मुख्यमंत्री बनणार होता.
मुस्लिम वोटसाठी मुर्शीदला हात लावणे जयेंद्रला परवडणार नव्हते.पण मुर्शीद जिवंत राहिला तर फरीद मरणार हे निश्चित होते. त्यामुळे फरीद काहीही करून मुर्शीदला मारणार .
मुर्शीद आपल्या मुलाला वाचविण्यासाठी पुन्हा शस्त्र हाती घेऊन या युद्धात उतरेल ?
जयेंद्रला निवडणूक जिंकण्यासाठी कोणाचे बलिदान द्यावे लागेल .??
के .के.मेननने थंड रक्ताच्या मुर्शीद पठाणची मुख्य भूमिका साकारली आहे. झाकीर हुसेनने फरीद बनून त्याला उत्तम साथ दिलीय. राजेश श्रींगारपुरे बऱ्याच काळाने जयेंद्रच्या भूमिकेत दिसलाय.
No comments:
Post a Comment