Saripodhaa Sanivaaram
सरिपोधा शनिवारम
काही लोकांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही हे खरं. लहानपणी सूर्यालाही आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नव्हते.
आईवडील, मोठी बहीण सर्व त्याच्या रागाला त्रासले होते .त्यात आई आजारी पण तिचे सूर्यावर खूप प्रेम.सूर्याचे आपल्या मामाच्या मुलीवर खूप प्रेम आहे.पण मामा, मामीला नेहमी मारायचा. सूर्याने मामावर हात उचलायलाही कमी केले नव्हते.म्हणून आईने मामी आणि भाचीला दूर पाठवून दिले.
एक दिवस तू आपल्या मनातील राग बाहेर काढू शकतोस पण बाकीचे सहा दिवस राग मनात दाबून ठेवायचा असे वचन आईने सूर्याकडून घेतले आणि तिचा मृत्यू झाला. मामाने आईच्या प्रेताला शिव्या दिल्या आणि सूर्याचा राग बाहेर पडला .तो दिवस शनिवार होता.
आता सूर्या इन्शुरन्स एजंट म्हणून काम करतोय.तो सहा दिवस खूप शांत असतो .आपल्या मनातील राग आणि त्या व्यक्तीचे नाव तो डायरीत लिहून ठेवतो आणि शनिवारी त्या व्यक्तीवर राग काढतो. तो अजूनही आपल्या मामाच्या मुलीवर प्रेम करतोय.
पोलीस हवालदार म्हणून चारुलता इन्स्पेक्टर दयानंद उर्फ दयाच्या सोकुलपलें पोलीस स्टेशनमध्ये रुजू होते.तिला हिंसा आवडत नाही.पण इन्स्पेक्टर दया क्रूर आहे .
सोकुलपलेंमध्ये काही जागा दयाच्या मालकीची आहे पण तिच्यावर त्याच्या मोठ्या भावाचा कुरमानंदचा हक्क आहे. त्याच्या सहीशिवाय ती जमीन दयाची होणार नाही . त्या जागेवर गरीब लोक राहतात ज्यांचे पूर्वज क्रूर दरोडेखोर चोर होते.दया आपला सर्व राग त्या लोकांवर काढीत असतो.
हवालदार चारूलताला सोकुलपलेंच्या लोकांविषयी सहानुभूती आहे.ती त्यांना मदत करायची संधी शोधत असते. त्यासाठी ती सूर्याची मदत घेते .
सूर्या फक्त शनिवारी आपला राग बाहेर काढतो. तो चारूलताला मदत करेल का ?? चारुलता आणि सूर्या एकमेकांना ओळखतात का ??
सुपरस्टार नानी सूर्याच्या मुख्य भूमिकेत आहे .पण प्रभावित करतो तो इंस्पेक्टर दयानंद बनलेला एस. जे. सूर्या .हा दया क्रूर आहे पण तितकाच गमतीशीर आहे आणि त्याला साथ दिलीय ती कुरमानंद झालेल्या मुरली शर्माने. दोघेही खलनायक आहे पण ते गमतीशीर ही आहेत.
चारूलता च्या भूमिकेत प्रियांका मोहन आहे.तिचा निरागसपणा भावतो.
चित्रपटात नेहमीप्रमाणे प्रचंड हाणामारी आहे.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
No comments:
Post a Comment