Rathnam
रत्नम
तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर तीन जणांनी हल्ला केला..त्यातील सर्व प्रवाश्याना लुटून हत्या केली गेली.या प्रकारणाचा शोध घेणाऱ्या पोलीस ऑफिसरचीही हत्या करण्यात आली.
काही दिवसांनी एक बुरखेधारी स्त्री आपल्या नवजात बालकाला घेऊन गावात शिरली .केळीची पाने सोलायची नोकरी करू लागली . तिच्या मत्यूनंतर आमदार सेलवनने त्याला सांभाळले .हाच मुलगा रत्नम नावाने सेलवनसाठी काम करू लागला.
सेलवन हा भला माणूस होता.जिथे पोलीस काही करू शकत नाही तिथे तो रत्नमच्या मदतीने प्रकरण सोडवत होता.
त्या दिवशी रत्नमला मल्लीगा दिसली.तिला पाहतच रत्नमला धक्का बसला.तो तिच्याशी बोलायला गेला पण अचानक काही गुंडांनी तिच्यावर हल्ला केला.हा हल्ला का ? कशासाठी याची तिलाही कल्पना नव्हती पण रत्नमने तिला वाचविले इतकेच नव्हे जितके दिवस ती गावात आहे तितके दिवस तिचे रक्षण करायची जबाबदारी ही घेतली.पण गुंड सतत तिच्यावर हल्ला करीत होते.
एका जमिनीच्या संदर्भात काही लोक तिच्या परिवारावर दबाव टाकतात असे तिने रत्नमला सांगितले .रत्नमने माहिती काढली तेव्हा ते लोक राजकारणी आणि बिमा रायडू हा माफिया आहे हे रत्नमला कळले आणि त्याने ती जमीन बिमा रायडूला देण्याचा सल्ला मल्लिगाच्या परिवाराला दिला.
त्या जागेवर खाजगी हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायचे रायडूच्या मनात आहे.पण मल्लिगा आणि तिच्या परिवाराचा नकार आहे.
रत्नम मल्लिगाच्या मागे ठामपणे उभा राहून रायडूला आव्हान देतो .आता रक्तपात अटळ आहे. पण रत्नम मल्लिगाचे रक्षण का करतोय ? गावातील पुजाऱ्यांशी रत्नमचा काय संबंध आहे ??
काही वर्षांपूर्वी तिरुपतीच्या भाविकांची लुटून हत्या झाली त्याचा रत्नमच्या आईचा संबंध आहे का ??
एक्शन हिरो विशाल रत्नमच्या प्रमुख भूमिकेत आहे म्हणजे चित्रपटात प्रचंड हाणामारी आणि सुसाट अंगावर काटा येणारे पाठलाग आहेत.
मुरली शर्मा रायडूच्या खलनायक भूमिकेत आहे .
ऍक्शन चित्रपट ज्यांना आवडतात त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा .
No comments:
Post a Comment