Mrs. Serial Killer
मिसेस सिरीयल किलर
डॉ. मृत्युंजय मुखर्जी उर्फ जॉय हा शहरातील नामांकित डॉक्टर.आपल्या बायकोवर सोनावर त्याचे खूप प्रेम.त्या दिवशी तो शहराबाहेर गेला असताना सोनाचा आधीचा प्रियकर इंस्पेक्टर इम्रान तिच्या घरी येतो आणि जॉयचा कंगवा ,ओढलेल्या सिगारेटचे तुकडे घेऊन जातो.
शहरात काही तरुणींचे अपहरण होऊन खून झालेले आहेत.या हत्या डॉक्टर जॉय मुखर्जीने केल्या आहेत असे इंस्पेक्टर इम्रान चोरलेले पुरावे दाखवून सिद्ध करतो. पुढे त्या तरुणींच्या खुनाच्या आरोपाखाली जॉयला अटक होते.खून झालेल्या सर्व तरुणी लग्नाआधीच गरोदर असतात.
जॉय आपल्या सुटकेसाठी रस्तोगी वकिलाचे नाव सोनाला सुचवितो.सोना रस्तोगी वकिलाला भेटते पण तो आजारी अपंग असतो.तरीही तो जॉयची केस स्वीकारतो. रस्तोगी जामिनासाठी अर्ज करतो पण भक्कम पुरावे असल्यामुळे त्याचा जामीन फेटाळला जातो.
रस्तोगी सोनाला पुन्हा एखाद्या गरोदर तरुणीचा खून झाला तर जॉयवरील संशय दूर होईल असा सल्ला देतो.नवऱ्यावरील प्रेमाखातर सोना अशी तरुणी शोधून तिचा खून करायचा ठरविते.त्यानुसार ती एका गरोदर तरुणीचा शोध घेऊन तिचे अपहरण ही करते .
पण पुढे काय ??
जॉय मुखर्जीची सुटका होईल ?
खरा सिरीयल किलर कोण आहे ?
चित्रपट थोडा मजेशीर घेतला असल्यामुळे रंगत मध्येमध्ये कमी होते.पण एकदा टाईमपाससाठी पाहण्यास हरकत नाही.चित्रपट शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
जॅकलीन फर्नांडिस ,मनोज वाजपेयी, आणि मोहित रैना प्रमुख भूमिकेत आहेत .
No comments:
Post a Comment