Tuesday, July 4, 2023

कथाल

कथाल ए जॅकफ्रुट मिस्ट्री
त्या एमएलएच्या बंगल्यातील झाडावरून दोन फणस नाहीसे होतात आणि तो संतापून पोलिसांना बोलावतो.आता फणसाच्या चोरीचा शोध कोण आणि कसा घेणार ? 
सर्व वरिष्ठ अधिकारी आपापल्या ज्युनियरवर ती जबाबदारी ढकलून मोकळे होतात.इन्स्पेक्टर महिमा सर्वाची ज्युनियर त्यामुळे जबाबदारी तिच्यावरच येते.
त्या आमदाराचा रोष सहन करीत आपल्या सहकार्यांना घेऊन ती तपासास सुरवात करते. कोणतरी बळीचा बकरा बनवून त्याला तुरुंगात टाक असे तिचे वरिष्ठ सल्ला देतात पण तिला ते पटत नाही .शेवटी एक संशयित तिला सापडतो.एक म्हातारा जो बंगल्यात माळी होता आणि चोरीच्या घटनेनंतर गायब होता.
ती त्याला अटक करते पण तो रडत रडत गुन्हा नाकबूल करतो.उलट माझी मुलगी काही दिवसांपासून हरवली आहे आणि तिची तक्रारही पोलीस घेत नाही असा आरोप करतो.गोष्ट खरी असते .ह्या कथाल चोरीमुळे पोलिसांना दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायला वेळ नाही.
महिमा एक युक्ती करते. फणसाची चोरी त्या मुलीने केलीय असे जाहीर करते. ताबडतोब त्या मुलीला शोधा असा वरून आदेश निघतो.महिमाला तिचा शोध घेताना अनेक अनपेक्षित गोष्टी आढळतात. एक असे कारस्थान जे अनेक वर्षापासून चालू आहे याचा सुगावा तिला लागतो आणि चित्रपटाचा गमतीशीर प्रवास गंभीर होत जातो.आतापर्यंत हसत हसत त्याची मजा घेत असलेला प्रेक्षक गंभीर होतो .
काय आहे ते कारस्थान ? महिमा त्या मुलीला शोधण्यात यशस्वी होईल का ? फणस कोणी चोरले ??एका छोट्या गावात घडणारी गोष्ट आपल्याला अनेक सामाजिक गोष्टी चालीरीती यांची जाणीव करून देते.
विजयराज आणि राजपाल यादव हे दोनच ओळखीचे चेहरे यात आहेत.सानया मल्होत्रा आणि अनंत जोशी मुख्य कलाकार यादीत आपली छाप पाडून जातात.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.एकदा पहाच 

No comments:

Post a Comment