Thursday, July 6, 2023

बर्ड बॉक्स

BIRD BOX
बर्ड बॉक्स
त्या शहरात अचानक सामूहाईक आत्महत्येचे प्रकार सुरू झाले.यामागे सैतान आहेत असे म्हटले जात होते तर काहीजण अमानवीय पशू पक्षी आहेत असे म्हणत होते.पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी बघणारे आत्महत्या करायचे.
मॅलोरी गरोदर आहे.ती हॉस्पिटलमध्ये चेकिंग करायला जाते आणि तिथेच सामूहाईक आत्महत्येचे प्रकार चालू होतात यात तिची बहीणही मरते. शेवटी एका घरात तिला आश्रय मिळतो .तिथे आधीच काही व्यक्ती राहत असतात.ऑलिपिया नावाची दुसरी गरोदर स्त्री तिथे आश्रयास येते.दोघींही एकाच वेळी मुलांना जन्म देतात .मॅलोरीला मुलगा तर ऑलिपियाला मुलगी होते.पण घरातील सर्व आत्महत्या करतात. त्यातील एक तरुण टॉम मॅलोरीला वाचवतो.ते दोघेही दोन्ही मुलांना घेऊन दूर जंगलात निघून जातात. पक्षांना या संकटाची आधीच जाणीव होत असते म्हणून मॅलोरी आपल्यासोबत पक्षी ठेवते. या गोष्टीला पाच वर्षे होतात .टॉम आणि मॅलोरी दोन्ही मुलांसोबत त्या जंगलातच राहत असतात. त्यांचा बराचसा वेळ डोळ्यावर पट्टी बांधूनच जात असतो.ते मुलांनाही डोळ्यावर पट्टी बांधून जगायचे शिकवितात.अचानक काही व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करतात.त्यात टॉम मारला जातो.
आता मॅलोरीला दोन्ही मुलांना घेऊन अश्याजागी जायचे आहे जिथे ती सुरक्षित राहील.तिला काही माणसे कुठे यायचे ते सांगतात.पण तो मार्ग खडतर आहे. आत्महत्येनी पछाडलेली माणसे जागोजागी आहेत .तर त्या वातावरणातही हा रोग पसरला आहे.फक्त पक्षीच त्यांना संकटाची आगाऊ सूचना देऊ शकतात.आपल्या आणि दोन्ही मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधून मॅलोरी प्रवासास सुरुवात करते.ती पक्ष्यांना एका बॉक्समध्ये घेते. ती इच्छित सुरक्षितस्थळी सुखरूप पोचेल का ?? 
सॅन्ड्रा बुलॉकने नेहमीप्रमाणे अभिनयात कमाल केली आहे पण त्यातही ती दोन छोटी मुले भाव खाऊन जातात.त्यांचा निरागस चेहरा आईसोबत राहणे, ती जे सांगेल तसेच वागणे .डोळ्यावर पट्टी बांधून प्रवास करणे आपल्याला आतून हलवते.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment