Tuesday, July 18, 2023

RAANGI

RAANGI
सुष्मीताचा तो घाणेरडा विडिओ पाहून तिचा बाप अस्वस्थ झाला होता.त्याला एका नंबरवरून सतत तो विडिओ येत होता.शेवटी त्याने आपल्या बहिणीला हे सर्व सांगितले. 
थैयल नायगी तरुण पत्रकार होती.तिने आपल्या सोर्समार्फत त्या मुलाला शोधून काढले.त्याने सांगितले सुष्मीता माझी फेसबुक फ्रेंड आहे आणि तिनेच हा व्हिडिओ मला पाठवला.सुष्मीता फक्त सोळा वर्षाची अल्लड मुलगी होती.तिचे तर फेसबुक अकाउंटही नव्हते आणि त्या मुलाला तर ती ओळखत ही नव्हती.
केवळ फेसबुक अकाउंट ब्लॉक करून चालणार नाही तर या प्रकरणाची मुळेच उखडून टाकली पाहिजे असे ठरवून नायगीने शोध सुरू केला .सुष्मीताच्या मैत्रिणींना भेटून तिने फेक अकाउंट कोणी बनविला याचा शोध घेतला .तिच्याकडून पासवर्ड घेऊन चॅटिंग करणाऱ्या सर्व व्यक्तींना एकत्र बोलावून समज दिली .
आता नायगी अकाउंट ब्लॉक करणार इतक्यात त्यावर अजून एक मेसेज आला .चॅटिंग करताना तो मुलगा लिबियात आहे असे समजले.पुरावा देताना त्याने आपल्या ठिकाणी होत असलेल्या मिटिंगचे फोटो पाठविले ज्यात भारतातील एक मंत्री तिथे असल्याचे दिसले.नायगीने तो फोटो आपल्या चॅनेलवर प्रसिद्ध केला आणि त्या मंत्र्यांचे कारस्थान उघडकीस आणले.
आमीन हा सतरा वर्षाचा तरुण .आता तो आपल्या हक्कासाठी अमेरिकेविरुद्ध लढतोय.तोच सुष्मीताशी वेळ मिळेल तसे चॅटिंग करतोय.  त्याचे कॉन्टॅक्ट इतके मजबूत आहेत की तो लिबियातून तामिळनाडूतील पोलीस स्टेशनवर हल्ला करून पोलिसांना मारतो.
नायगी सुष्मीता बनून त्याच्याशी रोज चॅट करतेय .तिला शोधून काढायचे आहे की हा नक्की कोण आहे. चॅटिंग करताना तो सांगतो जर आमच्याकडे तेलाचे साठे नसते तर गडाफी आणि आमचे नेते मारले गेले नसते आम्हाला आतंकवादी म्हटले नसते.
आता एफबीआय त्यांच्या मागे लागलीय.ते नायगी आणि सुष्मीताला हाताशी धरून आमीनला शोधायचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वी होतील का ??
सुष्मीताला एकदा तरी भेटायची आमीनची इच्छा पूर्ण होईल का ??
सुष्मीताला खरे काय आहे ? आमीन कोण आहे ? हे समजेल का ? 
फेसबुकच्या एका फेक अकाउंट वरून काय काय घडू शकते हे पहायचे असेल तर हा तामिळ चित्रपट जरूर पहा .
चित्रपट तामिळ भाषेत असला तरी सब टायटल्स हिंदीत आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे .

No comments:

Post a Comment