Monday, July 10, 2023

ओल्ड

OLD
ओल्ड
गाय आणि प्रिसियाने ते रिसॉर्ट इंटरनेटवरून शोधले होते.आपल्या दोन मुलांसह ते तिथे पोचतात.त्यांची मुलगा साधारण सहा वर्षाचा तर मुलगी आठ वर्षाची असेल.रिसॉर्टवर अजूनही काही फॅमिली आल्यात.
रिसॉर्टचा मॅनेजर त्यांना थोड्या अंतरावर असलेल्या छोट्या बेटावर फिरायला येणार का ? असे विचारतो आणि ते तयार होतात.दुसऱ्या दिवशी गाडीत अजून काही फॅमिली त्यांच्यासोबत असतात.
बेट अतिशय सुंदर आहे.स्वच्छ निळा समुद्र ,सोनेरी वाळू आणि निर्मनुष्य .मुले तिथे खेळतात, स्त्री पुरुष पाण्यात पोहतायत.
अचानक त्यातील एकाला जाणवते की मुले आपल्या वयाच्या मानाने मोठी दिसतायत.थोड्यावेळाने ती लहान मुले मोठी होतात.इतकेच नव्हे तर सर्वानाच आपल्या शरीरात बदल जाणवतो. सर्वांना कळते आपण वयाने वाढतोय .पण आता ते तिथे अडकले आहेत.मोबाईलची रेंज नाही.आजूबाजूला लोकवस्ती नाही .त्यांना बेटावर सोडून गेलेली बस परत गेलीय. अडकलेल्या व्यक्तींचा एक एक करून मृत्यू होतोय.काय आहे त्या बेटाचे रहस्य ? मोजक्याच व्यक्तींना का निवडण्यात आलेय.?  या बेटावरून बाहेर पडण्यात कितीजण यशस्वी होतील आणि कसे ?
एम.नाईट श्यामलन दिग्दर्शित हा चित्रपट आहे यावरूनच त्याची गूढता किती असेल याची कल्पना करू शकतो.
चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment