Thursday, July 13, 2023

ब्लाईन्ड

BLIND
ब्लाईन्ड
जिया एक तरुण पोलीस अधिकारी .ती अनाथाश्रमात मोठी झालीय. एके दिवशी तिच्या मानलेल्या भावाला पबमधून जबरदस्तीने बाहेर घेऊन येते.गाडीत दोघांची थोडी झटापट होते आणि गाडीचा अपघात होतो त्यात तिचा भाऊ मरतो आणि ती आंधळी होते.
पुढे ती अंध व्यक्तींसाठी असलेले शिक्षण घेते आणि पुन्हा पोलीस खात्यात जॉब मिळवायचा प्रयत्न करते पण त्यात यश येत नाही .एके दिवशी ती अनाथाश्रमातून रात्री उशिरा बाहेर पडते आणि टॅक्सीची वाट पाहत असते.एक टॅक्सी तिला मिळते .योगायोगाने तो ड्रायव्हर भारतीयच असतो . प्रवासात तिला गाडीच्या डिकीत कोणीतरी असल्याचा भास होतो .ती टॅक्सी थांबवून त्याला जाब विचारते पण तो तिच्यावर हल्ला करून पळून जातो.
ती आपले स्टेटमेंट पोलिसांना देते पण पोलीस तिच्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत.पृथ्वी नावाच्या सुस्त अधिकाऱ्याकडे तिची केस देण्यात येते. बातम्यांमध्ये एक मुलगी त्या भागातून गायब झालीय असे सांगितले जाते.जियाला खात्री पटते त्या दिवशी टॅक्सीच्या डिकीत तीच मुलगी होती. पृथ्वी जिया आंधळी आहे म्हणून लक्ष देत नाही पण तिची बुद्धीमत्ता आणि टॅक्सी ड्रायव्हरचे साधारण वर्णन ऐकून आश्चर्यचकित होतो.
निखिल नावाचा तरुण बक्षिसाच्या आशेने पृथ्वी आणि जियाला अर्धवट सत्य माहिती सांगतो .
ही सर्व माहिती त्या खुन्याला कळते .आता तो निखिल आणि जियाच्या मागे लागलाय.
पृथ्वी त्या दोघांना पुरेसे संरक्षण देईल का ??
तो खुनी कोण आहे ??
एक आंधळी तरुण मुलगी आणि तरुण मुलगा त्या खुन्याला कसे तोंड देतील.
सोनम कपूरने जियाची व्यक्तिरेखा छान रंगवली आहे.तर विनय पाठक पृथ्वीच्या भूमिकेत शोभून दिसतो.
संपूर्ण चित्रपट परदेशात का चित्रित केलाय ते कळत नाही.अशी कथा भारतात ही चित्रित करता आली असती.
चित्रपट जिओ सिनेमावर फ्रीमध्ये उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment