Tuesday, July 18, 2023

अज्ञात गांधी

अज्ञात गांधी
नारायणभाई देसाई
अनुवाद .. सुरेशचंद्र वारघडे
समकालीन प्रकाशन 
अचंबित करणाऱ्या बापूकथा असे लेखकाने लिहिलंय आणि ते खरेच आहे.नारायणभाई देसाई हे गांधीजींचे निकटवर्तीय. त्याचे वडील महादेवभाई देसाई हे गांधीजींचे स्वीय सचिव होते.त्यामुळे ते लहानपणापासूनच गांधीजींच्या निकट सहवासात होते.त्यांच्याबरोबरच दांडियात्रा ,चलेजाव चळवळीत भाग घेतला होता.
या पुस्तकात त्यांनी गांधीजींच्या अनेक अज्ञात गोष्टी उलगडवून दाखविल्या आहेत. सत्याग्रहाचा जन्म ,उपोषणाची सुरवात तसेच दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना ट्रेनमधील पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर काढले गेले आणि त्यानंतर गांधीजींनी कसा लढा दिला हे सविस्तरपणे लिहिले.
चंपारण्यातील आंदोलनाची सुरवात का आणि कशी झाली ? त्यासाठी गांधीजींनी किती प्रयत्न केले याचे रोमांचकारी वर्णन आहे. तर गांधीजींनी आपली वेशभूषा का बदलली ह्याचेही हृदयद्रावक कारण सांगितले आहे.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी दिलेला लढा तर त्यांनी असहकार चळवळीत केलेले आवाहन वाचून आपण खरोखरच अचंबित होतो.
प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक .

No comments:

Post a Comment