Wednesday, July 5, 2023

स्कायस्क्रॅपर

SKYSCRAPER
स्कायस्क्रॅपर
पर्ल हॉंगकॉंगमधील 225 मजल्याची सर्वात उंच इमारत होती. तिचे काही मजले जनतेसाठी खुले झाले होते आणि आता उरलेले मजले खुले होणार होते.पण त्याआधी विल सॉयर हा सिक्युरिटी कन्सल्टंट त्याची पाहणी करायला आणि परमिशन द्यायला आलाय. विलसोबत त्याची फॅमिली आहे.पत्नी आणि दोन मुले.सध्या ते 96 व्या मजल्यावर राहातायत.
विल सॉयर एक मरीन आहे.दहावर्षांपूर्वी एका ओलीस ठेवलेल्या  मुलाला वाचवताना त्याचा पाय गुढग्यातून कापला गेलाय. सध्या तो कुत्रिम पाय लावून फिरतो.
विल इमारतीच्या मालकांकडून सिक्युरिटी सिस्टीम असलेला टॅब घेतो आणि दोन किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या सिस्टीम सेंटरला भेट देण्याचे ठरवितो.तोपर्यन्त त्याचे कुटुंब झूला जायचे ठरविते.
रस्त्यात काही माणसे विलवर हल्ला करून त्याचा टॅब ताब्यात घेतात. त्यानंतर तीच माणसे पर्लची सिस्टीम ताब्यात घेऊन संपूर्ण यंत्रणा हॅक करतात . झू बंद झाल्याने विलचे कुटुंब परत पर्लमध्ये येते. काही माणसे 96 व्या मजल्याला आग लावतात.त्यांचे साथीदार सर्व यंत्रणा बंद करून टाकतात .
आपल्या मजल्यावर आग लागलीय हे विलची बायको विलला कळविते. सर्वत्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे विलला इमारतीत शिरण्यासाठी दुसरा खडतर मार्ग अवलंबावा लागतो.तो इमारतीत कसा शिरतो हे बघण्यासारखे आहे.
पुढे सुरू होता विलचा आपल्या कुटुंबापर्यंत पोचण्याचा रोमांचक अंगावर काटे आणणारा प्रवास .
बोथा नावाच्या अतिरेक्यांने आपल्या साथीदारांसह हे सर्व योजनाबद्धरित्या घडवून आणलेले असते.हळू हळू संपूर्ण इमारतीत आग पसरत जाते. एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला अतिरेकी यातून विल आपल्या परिवारासह सुखरूप बाहेर पडेल का ??? 
वायने जॉन्सन उर्फ द रॉक याची प्रमुख भूमिका आहे आणि तो त्यात शोभून दिसतो.
 श्वास रोखून धरणारा आणि संपेपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment