Wednesday, July 26, 2023

द ग्लोरी

द ग्लोरी
THE GLORY
बदला घ्यायचा ठरला तर त्यासाठी कितीही वर्ष वाट पहायची तयारी ठेवावी लागते. बदला घेणारे संधीची वाट पाहत असतात .काहीजण डायरेक्ट आक्रमण करतात काहीजण हळूहळू बदला घेतात.
मून डाँग गरीब विद्यार्थिनी .तिचे शाळेत रोज रॅगिंग होत असते.रॅगिंग करणाऱ्यांचा पाच विद्यार्थ्यांचा ग्रुप असतो .त्यात तीन मुली आणि दोन मुले असतात .टॉयलेट साफ करायला लावणे , अंगावर ड्रायर आणि इस्त्रीचे चटके देणे शिवाय प्रचंड मारहाण तिला रोज होत असते .
ती याविरुद्ध पोलिसात तक्रार करते पण ही सर्व मोठ्या घरातील मुले असल्यामुळे हिलाच बोलणी ऐकावी लागतात .बऱ्याचदा तिला आत्महत्या करावीशी वाटते .या आधीही एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेली असते. 
मून डाँगला तर घरुनही सपोर्ट नसतो .शेवटी ती कंटाळून शाळा सोडायचे ठरविते .ती शाळा सोडायचे खरे कारण देते आणि त्या पाचही विद्यार्थ्यांची नावे लिहिते .पण तिच्यावर त्यांची नावे काढून टाकण्याचे दडपण येते ती नकार देताच शिक्षक तिला मारहाण करतात . मग तिच्या आईला पैसे देऊन प्रकरण मिटविले जाते .
मून डाँग आता दिवसरात्र त्यांच्या मागावर आहे.ती कामे करून आपले शिक्षण पूर्ण करते शिक्षिका बनते.पण आपल्याला त्रास देणारे सर्वच तिच्या रडारवर आहे. आता या गोष्टीला अठरा वर्षे पूर्ण झालीत .तिच्याकडे प्रत्येकाची  सखोल माहिती आहे .
आता तिचा बदला सुरू होणार आहे .ती प्रत्येकाला सजा देणार आहे पण प्रत्यक्षात ती कोणाला मारणार नाही.त्यांचे इगो ,सवयी ,सामाजिक प्रतिष्ठा यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करणार आहे.यातून कोणी म्हणजे कोणीच वाचणार नाही .
तुम्हाला हा सूडपट पाहायचा असेल तर कोरियन सिरीज द ग्लोरी नक्कीच पहा. अतिशय कमी हिंसाचार असलेली थोडी संथ पण उत्कंठा वाढवीत जाणारी ही सिरीज आपल्याला नक्की आवडेल .
सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

No comments:

Post a Comment